ट्विटरवर जगात सर्वाधिक 'फेक' फॉलोअर्स नरेंद्र मोदींना!

ट्विटरवर जगात सर्वाधिक 'फेक' फॉलोअर्स नरेंद्र मोदींना!

नुकतंच ट्विटरने त्याच्या अकाऊटंसचं ऑडिट केलं. यामध्ये फेक फॉलोअर्सचा छडा लावण्यात आला. नरेंद्र मोदींना ट्विटरवर एकूण 4 कोटी फॉलोअर्स आहेत.

  • Share this:

13 मार्च:  भारताचे पंतप्रधान नरेंद्र  मोदी हे एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असल्याची चर्चा  सगळ्याच जगात सुरू आहे.पण मोदींचे ट्विटरवरचे 60 % फॉलोअर्स  फेक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसंच जगात सर्वात जास्त फेक फॉलोअर्स नरेंद्र मोदींनाच असल्याचंही पुढे आलंय.

नुकतंच ट्विटरने त्याच्या  अकाऊटंसचं  ऑडिट केलं. यामध्ये फेक फॉलोअर्सतचा छडा लावण्यात आला.  नरेंद्र मोदींना ट्विट्वरवर एकूण 4 कोटी फॉलओअर आहेत. त्यातील 2कोटी 40 लाख फॉलोअर्स बनावट आहेत. या यादीत मोदींच्या खालोखाल  पोप फ्रान्सिस यांचं नाव  आहे.या यादीत डॉनाल्ड ट्रम्प चौथ्या नंबरवर  आहेत. त्यांचे 37 टक्के फॉलोअर्स  नकली आहेत

निवडणुकीच्या रणधुमाळीत मोदींचे समर्थक त्यांच्या अनेक न केलेल्या कार्यांचीही स्तुती करत असतात. पण आता ट्विटरनेच ही यादी दिली असल्यामुळे पंतप्रधान जगात खरंच किती प्रसिद्ध आहेत याबद्दल संभ्रम निर्माण झालाय. टाईम्स मॅग्झिनच्या यादीतही याआधी नरेंद्र मोदी झळकले होते.

First published: March 13, 2018, 8:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading