नवनिर्वाचित BJP खासदारांच्या बैठकीनंतर मोदी झाले खूश; सोशल मीडियाबाबत दिला मोलाचा सल्ला

नवनिर्वाचित BJP खासदारांच्या बैठकीनंतर मोदी झाले खूश; सोशल मीडियाबाबत दिला मोलाचा सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात असतात. मन की बात किंवा जनतेशी संवाद साधत त्यांनी आतापर्यंत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जुलै : सध्या देशात कोरोनासह भारत-चीनमधील वाढता तणाव, अयोध्येतील राम मंदिर हे चर्चेचे विषय आहेत. कोरोनाचा सर्वच क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. अशाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीला संबोधित केलं, यासंदर्भात त्यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की – राज्य सभेतील भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांशी संवाद साधला. देशाच्या सेवेसाठी त्यांचे विचार व मत ऐकून खूप चांगलं वाटलं. हे सर्व खासदार संसदेच्या कामकाजात मोठं योगदान देतील.

हे वाचा-

याशिवाय ते पुढे म्हणाले की – नवन्या पॉलिसीबाबत माहिती जाणून घ्या व कायम अपडेट राहा. याशिवाय राज्य सभेच्या फ्लोअरवर आणि लोकांमध्ये अधिक प्रभावी राहण्याचा प्रयत्न करा. सातत्याने लोकांशी संपर्कात राहा. यासाठी सोशल मीडियासह नवनवे तंत्रज्ञान शिकून घ्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात असतात. मन की बात किंवा जनतेशी संवाद साधत त्यांनी आतापर्यंत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: July 22, 2020, 7:13 PM IST

ताज्या बातम्या