'मोदी है तो मुमकीन है'...अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचे उद्गार

'मोदी है तो मुमकीन है'...अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचे उद्गार

लोकसभा निवडणुकीत 'मोदी है तो मुमकीन है', अशी भाजपची घोषणा होती. आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनीही या शब्दांत मोदींची स्तुती केली आहे. 'मोदी है तो मुमकीन है' असा विश्वास त्यांनीही दाखवला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 13 जून : लोकसभा निवडणुकीत 'मोदी है तो मुमकीन है', अशी भाजपची घोषणा होती. आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनीही या शब्दांत मोदींची स्तुती केली आहे. 'मोदी है तो मुमकीन है' असा विश्वास त्यांनीही दाखवला आहे.

अमेरिकेमध्ये पुढच्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. लोकसभा निवडणुकीत 'आएगा तो मोदीही' ही घोषणा खूपच गाजली होती. त्याचप्रमाणे आता अमेरिकेतही 'आएगा तो ट्रम्पही' अशी घोषणा दिली जाते आहे.

मोदींच्या विजयाबद्द्लच्या घोषणा फक्त भारतातच नाही तर जगभरात गाजल्या हेच यावरून दिसतं.

एस. जयशंकर यांचीही स्तुती

माइक पॉम्पिओ यांनी नवे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचीही प्रशंसा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी सुदृढ करण्याच्या दृष्टीने कसे प्रयत्न करतात हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे, असंही ते म्हणाले.

भारत आणि अमेरिकेच्या व्यापारविषयक परिषदेत पॉम्पिओ यांनी हे उद्गार काढले. ते 24 जूनला भारत दौऱ्यावर येत आहेत. भारताचे नवे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. मोदींना त्यांची खंबीर साथ आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मैत्रीचं नवं पर्व

भारत आणि चीन, अमेरिका या महासत्तांच्या मैत्रीचं नवं पर्व सुरू करण्यात एस. जयशंकर यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळेच पॉम्पिओ यांनी एस. जयशंकर यांची प्रशंसा केली.

माइक पॉम्पिओ हे भारतासोबतच श्रीलंका, जपान, दक्षिण कोरिया या देशांचाही दौरा करणार आहेत. त्यांचा हा आशिया दौरा भारताच्य दृष्टीने सर्वात महत्त्वाचा आहे.

=============================================================================================

VIDEO : रेल्वे स्टेशनवरील बेंचेसही वादळामुळे उडाले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 08:51 PM IST

ताज्या बातम्या