वडिलांची नोकरी पुन्हा मिळावी यासाठी 13 वर्षाच्या मुलाची नरेंद्र मोदींना 37 पत्रं

वडिलांची नोकरी पुन्हा मिळावी यासाठी 13 वर्षाच्या मुलाची नरेंद्र मोदींना 37 पत्रं

Letter to Narendra Modi : वडिलांना नोकरी गमवावी लागल्यानंतर 13 वर्षाच्या मुलानं नरेंद्र मोदी यांना 37 वेळा पत्रं लिहिली आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 जून : वडिलांना गमावावी लागलेली नोकरी पुन्हा मिळवी याकरता 13 वर्षाच्या मुलानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 37 पत्रं लिहिली आहेत. सत्यजित विजय त्रिपाठी असं या मुलाचं नाव आहे. सत्यजितचे वडील उत्तर प्रदेश स्टॉक एक्सचेंजमध्ये कामाला होते. पण, 2016मध्ये त्यांना नोकरी गमवावी लागली. आपल्या वडिलांना पुन्हा नोकरी मिळावी यासाठी सत्यजितनं पंतप्रधान नरेंद्र मोंदींना 37 वेळा पत्रं लिहिलं आहे. शनिवारी लिहिलेल्या पत्रामध्ये त्यानं वडिलांना नोकरी नसल्यानं कुटुंबावर बेतलेल्य़ा परिस्थितीची माहिती दिली आहे. शिवाय, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानं त्याचं अभिनंदन देखील केलं आहे. ANIनं याबाबतची माहिती दिली आहे. शुक्रवारी त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना 37वं पत्र लिहिलं. त्यामध्ये त्यानं सारी परिस्थिती मांडली आहे.

मान्सूनची प्रतीक्षा संपली, पुढील काही तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

काय म्हणाला सत्यजित

काही लोकांमुळे माझ्या वडिलांना नोकरी सोडावी लागली. या पत्रातून मी मोदी बाबाजींना वडिलांच्या नोकरीसाठी विनंती केल्याचं सत्यजितनं म्हटलं आहे. मोदी है तो मुमकिन है हे मी ऐकलं आहे. त्यामुळे मी नरेंद्र मोदींना विनंती करत आहे त्यांनी माझ्या प्रश्नामध्ये लक्ष घालावं. अशी प्रतिक्रिया यावेळी सत्यजित यानं दिली.

पत्र लिहिल्यानंतर मात्र सत्यजितच्या वडिलांना धमकीचे फोन येऊ लागले आहेत. त्यामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. मी पत्र लिहिल्यामुळेच माझ्या वडिलांना धमकीचे फोन येत असल्याचं सत्यजित त्रिपाठी यानं म्हटलं आहे.

मंत्रालयात 'टाईमपास' बंद करा, सरकारची कर्मचाऱ्यांना ताकीद

मोदी दखल घेणार?

यापूर्वी अनेकांच्या पत्राची दखल ही खुद्द नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान कार्यालयातून घेतली गेली आहे. त्यामुळे 13 वर्षाच्या सत्यजितच्या पत्राची दखल आता नरेंद्र मोदी घेणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

राज्यात आजपासून गायीच्या दुधाचे नवे दर, यासोबत टॉप 18 बातम्या

First published: June 8, 2019, 9:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading