आता हाॅटेलचं जेवण होईल आरोग्यपूर्ण, 1 मार्चपासून लागू होणार नवे नियम

आता हाॅटेलचं जेवण होईल आरोग्यपूर्ण, 1 मार्चपासून लागू होणार नवे नियम

मोठी रेस्टाॅरंटस् रोज 50 लीटरपेक्षा जास्त तेल तळण्यासाठी वापरतात. आता या हाॅटेल्सना आपलं रेकाॅर्ड ठेवावं लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी : आता तुम्ही हाॅटेलमध्ये जाऊन बिनधास्त खाऊ शकता. कारण रेस्टाॅरंट आणि फूड कंपनीज एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरू शकणार नाहीत. सरकार आरोग्याला जे अपायकारक आहे, त्यावर प्रतिबंध करू इच्छितंय. तसे नियम 1 मार्चपासून लागू केले जाणार आहेत.

फूड रेग्युलेटर FSSAI या आदेशामुळे बऱ्याच गोष्टींना चाप लावू शकणार आहे. फॅट्समुळे हृदयविकार बळावतो. एकदा पदार्थांसाठी वापरलेले तेल पुन्हा वापरलं तर तेलात जास्त फॅट्स तयार होतात. यावर आळा बसवण्यासाठी सरकार हे पाऊल उचलतंय.

शिवाय बायोडिझल बनवणं हे भारताचं एक मिशन आहे. या नियमामुळे त्यालाही मदत मिळेल.

मोठी रेस्टाॅरंटस् रोज 50 लीटरपेक्षा जास्त तेल तळण्यासाठी वापरतात. आता या हाॅटेल्सना आपलं रेकाॅर्ड ठेवावं लागणार आहे. खाण्याचं तेल कुठून आणलं, किती वापरलं, तळून उरलेलं तेल किती हे सर्व काही डिटेल्स द्यावे लागणार आहेत. ते तेल सरकारी एजन्सींना परत द्यावं लागणार आहे.

सरकार त्याचं बायोडिझल बनवणार. फूड कमिशनर या सगळ्यावर देखरेख ठेवेल. त्यामुळे हाॅटेलचे शेफ एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरू शकणार नाहीत.

काही दिवसांपूर्वी FDAने एक धक्कादायक वास्तव जाहीर केलंय. महाराष्ट्रातली 86 टक्के हॉटेल्स खाण्याच्या दृष्टीनं असुरक्षित आहेत. अन्न आणि औषध प्रशासनानं (FDA)महाराष्ट्रातल्या 3047 हॉटेल्सचा सर्व्हे केला. त्यातल्या 2649 हॉटेल्समधलं अन्न सुरक्षित नाही, असं त्यांचं निरीक्षण आहे.

सँपल म्हणून सर्व्हे केलेल्या या 3047 हॉटेल्सपैकी बहुतेक हॉटेल्समध्ये स्वच्छतेचे नियम पाळलेले नव्हते. मुंबईतली 74 हॉटेल्स, पब्ज, रेस्टॉरंट्स आणि फूड जॉइंट्समध्ये मिळणारं अन्न सुरक्षित नाही, असा धक्कादायक रिपोर्ट अन्न आणि औषध प्रशासनानं (FDA)दिला आहे.

अन्न शिजवण्यासाठी वापरली जाणारी भांडी, किचनची स्वच्छता, कर्मचाऱ्यांनी घ्यायची काळजी, कचऱ्याची विल्हेवाट याबाबतीत FDAने काही नियम घालून दिले आहेत. बहुतेक सर्व फूड जॉइंट्स यातले अनेक नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत.

बर्फावरून पाय घसरल्यावर काय होतं, पाहा...VIDEO

First published: February 12, 2019, 6:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading