मोदी सरकारचा प्लॅन; 40 एक्सपर्टना देणार सरकारी अधिकारी होण्याची संधी

मोदी सरकारचा प्लॅन; 40 एक्सपर्टना देणार सरकारी अधिकारी होण्याची संधी

40 एक्सपर्टना मोदी सरकार सरकारी अधिकारी होण्याची संधी देणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जून : पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी प्रशासकीय दृष्ट्या सरकार मजबूत करण्यावर भर देताना दिसत आहेत. सरकारच्या नव्या प्लॅननुसार 40 एक्सपर्टनं सरकारी अधिकारी होण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे एक्सपर्ट लोकांना IAS सारखं पद मिळणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा या एक्सपर्ट लोकांना देण्यात येणार आहेत. पण, या अधिकाऱ्यांची नियुक्ती 3 वर्षासाठी कंत्राट पद्धतीनं केली जाणार आहे. पण, त्यांनी उत्तम काम केल्यास त्यांच्या कार्यकाळात 5 वर्षापर्यंत वाढ केली जाणार आहे. सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा धडाका लावला आहे.


मोदींचा दणका : Work From Home ला बंदी; 9.30 ला ऑफिसमध्ये हजर राहण्याचं फर्मान

लवकरच जाहिरात

40 एक्सपर्टच्या नियुक्तीसाठी लवकरच जाहिरात काढली जाणार आहे. उप सचिव ते संयुक्त सचिव या पदापर्यंत त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. पण, सर्व प्रथम त्यांची नियुक्ती ही सल्लागार म्हणून केली जाणार आहे. यापूर्वी सरकारनं एप्रिलमध्ये नऊ व्यक्तिंची संयुक्त सचिव पदावर नेमणूक केली आहे. संयुक्त सचिव पदावर IAS, IPS या पदावरील लोकांना नियुक्त करण्यात येतं.


आता ड्रोननं होणार Food Delivery; या कंपनीनं घेतला निर्णय

किती असणार नियुक्तीचा कार्यकाळ

एक्सपर्टची निवड ही तीन वर्षासाठी केली जाणार आहे. पण, उत्तम काम केल्यास हा कार्यकाळ 5 वर्षापर्यंत वाढवला जाणार आहे. केंद्र सरकार अंतर्गत यांचा पगार दिला जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा या एक्सपर्टना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे सध्या मोदी सरकारच्या नव्या निर्णयावर चर्चा देखील होताना दिसत आहे.


नाशिकमध्ये केमिकलचा ट्रक उलटला, वाहतूक विस्कळीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 04:18 PM IST

ताज्या बातम्या