मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना दुसरं मोठं गिफ्ट, Single Parentसाठी केली मोठी घोषणा

मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना दुसरं मोठं गिफ्ट, Single Parentसाठी केली मोठी घोषणा

26 मे 2014 रोजी मोदींनी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

26 मे 2014 रोजी मोदींनी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

हा अतिशय पुरोगामी आणि सामाजिक बदल निर्माण करणार निर्णय आहे असंही सिंह यांनी सांगितलं.

  • Published by:  Ajay Kautikwar
नवी दिल्ली 26 ऑक्टोबर: केंद्र सरकाने दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना दुसरं मोठं गिफ्ट दिलं आहे. या आधी बोनस आणि काही सवलती देण्याची घोषणा केली होती. आता एकल पालकत्व (Single Parent) असलेल्या कर्मचाऱ्यांना मुलांची काळजी घेण्यासाठी रजा (child-care-leave) देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केलाय. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही घोषणा केली. घटस्फोटीत, विधुर किंवा लग्न न करता पालकत्व स्वीकारलेल्या सगळ्यांसाठी सुविधा असणार आहे. हा अतिशय पुरोगामी आणि सामाजिक बदल निर्माण करणार निर्णय आहे असंही सिंह यांनी सांगितलं. यासाठीचा आदेश काढण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. या आधी सरकारने 30 लाख कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची (Bonus For Government Employees) घोषणा केली होती. कॅबिनेटच्या या निर्णयाबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी माहिती दिली. जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीमार्फत (DBT Direct Benefit Transfer) हे पैसे पाठवले जाणार आहेत. 30 लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकार एकूण 3737 कोटी रुपये पाठवणार आहे. लगेचच या निर्णयाबाबत अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे. 3737 कोटी रुपये पोहोचणार कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर सरकारवर 3737 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. जावडेकरांनी दिलेल्या माहितीनुसार हा बोनस सिंगल इन्स्टॉलमेंटमध्ये डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पाठवला जाणार आहे. गेल्या आठवड्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्पेशल फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्कीमची सुरुवात केली होती. ज्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये अॅडव्हान्स घेता येणार आहेत. कोरोनाशी सामना करणारी अर्थव्यवस्था पाहता सीतारामन यांनी स्पेशल एलटीसी कॅश स्कीम योजनेची देखील घोषणा केली होती. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आहे. या स्कीममध्ये LTA च्या बदल्यात कॅश व्हाउचर मिळणार आहे. याचा वापर कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2021 पूर्वी करावा लागेल. त्याचप्रमाणे यासाठी काही गाइडलाइन्स देखील जारी करण्यात आल्या आहेत. मागणी वाढवण्यासाठी सरकारकडून गेल्या महिनाभरात असे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
First published:

Tags: PM narendra modi

पुढील बातम्या