धक्कादायक! मोदी सरकारच्या मंत्र्याच्या भावालाच मिळेना बेड; चर्चेनंतर याचना करणारं ट्वीट डिलिट

धक्कादायक! मोदी सरकारच्या मंत्र्याच्या भावालाच मिळेना बेड; चर्चेनंतर याचना करणारं ट्वीट डिलिट

जर केंद्रीय मंत्र्यांची ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? असा सवाल उपलब्ध होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 एप्रिल : सध्या देशभरात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि दुसरीकडे रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन अपुरा पडत आहे. ही परिस्थिती फक्त सर्वसामान्यांचीच नाही तर मंत्र्यांच्या नातेवाईकांचीही आहे. नुकतचं केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंह यांनी त्यांच्या भावाला रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याचं ट्वीट केलं आहे. सध्या त्यांचं हे ट्वीट व्हायरल होत आहे. व्हि.के. सिंह (Vijay Kumar Singh) हे मोदी सरकारमधील मंत्री तर आहेतच शिवाय ते भारताचे माजी लष्करप्रमुखही आहेत. त्यांच्या या ट्वीटमध्ये देशातील भीषण परिस्थिती समोर येत आहे.

जर केंद्रीय मंत्र्याची ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? असा सवाल उपलब्ध होत आहे. व्हि.के.सिंह यांनी ट्वीट केलं आहे की, आमची मदत करा. माझ्या भावाला कोरोनाची लागण झाली असून त्याच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात बेडची गरज आहे. यावेळी त्यांनी गाझियाबादच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनाही टॅग केलं आहे. गाझियाबादमध्ये बेडची व्यवस्था होत नसल्याचंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा-आंतरजिल्हा, आंतरराज्य प्रवासाच्या निर्बंधांबाबत केंद्राचे राज्यांना निर्देश

काही वेळानंतर हे ट्वीट डिलिट करण्यात आलं असून यावर मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भावाला बेड उपलब्ध झाल्याचे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

देशभरात कोरोनाचा प्रसार (Corona Spread) वाढत असतानाच मृतांच्या प्रमाणातही (Corona Deaths) वाढ झाली आहे. एकीकडे रुग्णांना उपचारासाठी जागा मिळत नसल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याची भयंकर स्थिती आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर पार्किंगमधील जमीनीवर अंत्यसंस्कार (Dead Corona Patients Funeral) करण्याची वेळ येत असल्याची भयंकर स्थिती समोर येत आहे. हे चित्र पाहायला मिळत आहे दिल्लीतील सीमापुरी स्मशानभूमीत. पार्किंगमध्येच आतापर्यंत पंधरा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: April 18, 2021, 3:08 PM IST

ताज्या बातम्या