BIG NEWS: केंद्राच्या 26 कंपन्यांचं होणार खासगीकरण, वाचा सर्व कंपन्यांची यादी

BIG NEWS: केंद्राच्या 26 कंपन्यांचं होणार खासगीकरण, वाचा सर्व कंपन्यांची यादी

या कंपन्यांमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडतो. तो कमी करण्यासाठी सरकार या कंपन्यांमधला आपला हिस्सा विकणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 6 सप्टेंबर: कोरोनामुळे आलेलं आर्थिक संकट (Coronavirus Crisis)  आणि त्यामुळे रुळावरून घसरलेली अर्थव्यवस्था (Economic Slowdown)  सावरण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार तब्बल 26 कंपन्यांचं खासगीकरण (Privatisation)  करणार आहे. RTIच्या माध्यमातून ही बाबत सष्ट झाली असून त्याची यादीही समोर आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman)  यांनी जुलै महिन्यात याबाबतची घोषणा केली होत. मात्र त्यांनी कंपन्यांची यादी दिलेली नव्हती.

या निर्णयाला कॅबिनेटनेही मंजुरी दिली आहे. सरकारच्या अनेक कंपन्या या तोट्यात असून त्यांना हजारो कोटींची मदत केंद्राला द्यावी लागते. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडतो. तो कमी करण्यासाठी सरकार या कंपन्यांमधला आपला हिस्सा विकणार आहे.

बाजार भावाप्रमाणे त्याची किंमत ठेवली जाईल असं सरकारने म्हटलं आहे.

Project & Development India Limited (PDIL)

Engineering Projects India Limited (EPIL)

1. Pawan Hans Limited (PHL)

2.B&R Company Limited (B&R)

3. Air India

4. Central Electronics Limited(CEL)

5.Cement Corporation India Limited CCIL (Nayagaon unit)

6.Indian Medicine & Pharmaceuticals Corporation Ltd. (IMPCL)

7.Salem Steel Plant, Bhadrawati Steel Plant, Durgapur Steel plan

हे वाचा - Alert! या बँकेतून कोणीही करू नका ट्रान्झॅक्शन, नाहीतर होईल मोठं नुकसान

10.Ferro Scrap Nigam Ltd. (FSNL)

11.Nagarnar Steel Plant of NDMC

12.Bharat Earth Movers Limited (BEML)

13.HLL Lifecare

14.Bharat Petroleum Corporation Ltd. (BPCL)

15.Shipping Corporation of India Ltd. (SCI)

16.Container Corporation of India Ltd (CONCOR)

17.Nilachal Ispat Nigam Limited (NINL).

18.Hindustan Prefab Limited (HPL)

19.Bharat Pumps and Compressors Ltd (BCPL)

हे वाचा - सुमद्रात तेलाच्या टँकरवर आगीचं तांडव, भारतीय नौदलाची थरारक कामगीरी, पाहा PHOTOS

20.Scooters India Ltd (SIL)

21.Hindustan Newsprint Ltd (HNL)

22.Karnataka Antibiotics & Pharmaceuticals Ltd (KAPL)

23.Bengal Chemicals and Pharmaceuticals Ltd. (BCPL)

24.Hindustan Antibiotics Ltd. (HAL)

25.Indian Tourism Development Corporation (ITDC)

26.Hindustan Fluorocarbon Ltd (HFL)

कोरोना व्हायरसशी (Coronavirus) दोन हात करणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian Economy) पहिल्या तिमाहीमध्ये जोरदार झटका सहन करावा लागला आहे. एप्रिल-जून 2020 च्या पहिल्या तिमाहीमध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) तब्बल 24 टक्के घट पाहायला मिळत आहे. हे पाहता वित्तीय वर्ष 2020-21 दरम्यान जीडीपीमध्ये मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

माजी केंद्रीय अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार जीडीपीमध्ये घट झाल्याने देश आणि विविध भागातील लोकांवर परिणाम होऊ शकतो.

देशाची जीडीपी चालू वित्त वर्षादरम्यान 10 ते 11 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की  देशाचा जीडीपी आणखी कमी होईल.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 6, 2020, 9:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading