बेहिशोबी संपत्ती बाळगणाऱ्यांना बसणार दणका, केंद्र घेणार आधारची मदत!

बेहिशोबी संपत्ती बाळगणाऱ्यांना बसणार दणका, केंद्र घेणार आधारची मदत!

काळ्या पैशानंतर आता मोदी सरकार बेहिशोबी मालमत्ता बाळगणाऱ्यांसाठी केंद्र सरकार नवा कायदा आणणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : मालमत्ता खरेदी-विक्रीत फसवणूक आणि बेहिशोबी संपत्ती बाळगणाऱ्यांविरुद्ध मोदी सरकार मोठं पाऊल उचलणार आहे. केंद्र सरकार मालमत्तेच्या मालकांसाठी फायद्याचा कायदा आणत आहे. यामध्ये स्थावर मालमत्तेच्या मालकी हक्कासाठी त्याला आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात येऊ शकते. यामध्ये जमिन-घर याच्या खरेदीत होणारी फसवणूक आणि बेहिशोबी मालमत्ता उघडकीस येईल. याबाबतचे वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे.

मालमत्ता मालकी संदर्भात कायद्याचा मसुदा तयार झाला असून यासाठी पाच सदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. समिती राज्यासोबत समन्वय करेल. मालमत्तेशी संबंधित प्रकरणं राज्याच्या अधिकारात येतात. यासाठी केंद्र सरकार याबाबत पावले उचलून त्याचा कायदा तयार करून राज्याकडे सोपवणार आहे.

मालमत्तेला आधाल लिंक केल्यास त्याची संपत्ती एखाद्याना फसवणूक करून लाटण्याचा प्रकार केला तर मदत होणार आहे. अशा प्रकारची संपत्ती सोडवण्याच काम सरकार करेल किंवा त्याबदल्यात मोबदला देईल. मात्र आधार लिंक केलं नाही तर सरकार कोणतीही जबाबदारी घेणार नाही. समितीमधील सदस्यांनी म्हटलं की, आधार लिंक करणं पर्यायी असेल. जर लोकांना वाटत असेल की त्यांच्या मालमत्तेची गॅरंटी सरकारने घ्यावी तर आधार लिंक करावे लागेल.

नोंदणी ऑफिसमध्ये आधारवर टायटल जनरेट करावं लागले. ते पुन्हा आधारला लिंक करावं लागले. तसेची रजिस्ट्रीसुद्धा विकल्यानंतर होईल. जमीनीच्या नोंदी अपडेट होतील. अर्धी मालमत्ता विकरल्यानंतरही रजिस्ट्री होताच सर्व अपडेट होईल. तसेच बायोमेट्रिकमुळे घरात बसून मालमत्ता विकता येईल. रजिस्ट्रीमध्ये एक महिन्याचा कालावधी लागेल.

नवीन कायदा दोन पद्धतीने लागू होईल. विक्री करताना किंवा हस्तांतरण करताना आधार लिंक होईल तर दुसऱे जिल्ह्यानुसार नियम लागू केला जाईल. याचा फायदा मालमत्ता धारकाला कर्ज मिळण्यासाठी होईल. तसेच जमीन संबंधी प्रकरणात कायदेशीर मदत लवकर मिळेल. मालमत्तेची माहिती पारदर्शक झाल्याने मालक आणि मालमत्ता यांची माहिती जिथल्या तिथे अपडेट होईल. मालमत्तेची प्रकरणं कमी होतील.

वाचा : तुम्हाला कोण ट्रॅक करतंय? नव्या अपडेटमुळे मिळणार रिपोर्ट

SPECIAL REPORT: सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्या 'या' नेत्यांना मतदारांनी दाखवला घरचा रस्ता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2019 07:16 AM IST

ताज्या बातम्या