News18 Lokmat

आता येणार नाही विजेचं बिल, नव्या वर्षाआधीच सरकारचा मोठा निर्णय

लवकरच तुमच्या घरी विजेचं बिल येणार नाही. याची सुरुवात पुढच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2018 04:01 PM IST

आता येणार नाही विजेचं बिल, नव्या वर्षाआधीच सरकारचा मोठा निर्णय

जर तुम्हीही वाढत्या विजेच्या बिलांनी हैराण झाला असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. लवकरच तुमच्या घरी विजेचं बिल येणार नाही. याची सुरुवात पुढच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून होणार आहे. मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेत, वीज मंत्रालयाने पुढील तीन वर्षांत देशभरातील विजेचे मीटर स्मार्ट प्रीपेडमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

वीज मंत्रालयाच्या या निर्णयाचा खरा हेतू हा विजेचं ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशनमध्ये होणारी नुकसान भरपाई भरून काढणं आहे. तसेच यामुळे वितरण कंपन्यांची स्थिती चांगली होईल आणि ऊर्जा संरक्षणेला प्रोत्साहन मिळेल. कागदाची बिलं येणं बंद झाल्यावर बिल भरणंही अधिक सोपं होईल.

सरकारच्या मते, स्मार्ट मीटर ही गरिबांच्या फायद्याची गोष्ट आहे. या मीटरमुळे ग्राहकांना संपूर्ण महिन्याचं बिल एकत्र भरण्याची गरज नाही. ग्राहक आपल्या गरजेनुसार बिल भरू शकतात. एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणात स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विनिर्माणाने देशात युवकांना रोजगारही मिळेल.

राज्य सरकारने सगळ्यांसाठी विजेच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत आणि ग्राहकांना सातही दिवस २४ तास वीज देण्याचे मान्य केले आहे. यानुसार वितरण लायसन्समध्ये १ एप्रिल २०१९ किंवा त्याहून आधी ग्राहकांना सातही दिवस २४ तास वीज मिळण्याची सोय केली जाईल.

सगळ्या स्मार्ट मीटरला वीज निगमच्या कंट्रोल रूमशी जोडण्यात येईल. कर्मचारी स्काडा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कंट्रोल रूममधुनच मीटर रीडिंग घेऊ शकतात. तसेच मीटर सोबत कोणी छेडछाड केली की त्याचे संकेतही कंट्रोल रूममध्ये मिळतील.

Loading...

जर ग्राहकाने बिल भरले नाही तर कंट्रोल रूममधूनच त्याचे कनेक्शन कापले जाईल. यासाठी कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या घरी जाण्याची वेळ येणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 25, 2018 03:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...