लॉकडाऊनबाबत 12 एप्रिलला मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

लॉकडाऊनबाबत 12 एप्रिलला मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 एप्रिल : देशातील कोरोना व्हायरस संक्रमित लोकांनी 5 हजाराचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत जवळपास 401 लोक बरे झाले आहेत, तर 149 लोकांचा झाला आहे मृत्यू झाला आहे. गेल्या 12 तासांत देशभरात 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात आहे.

कोरोना व्हायरस मूळे देशपातळीवर असलेल्या लॉकडाऊनसंदर्भात आगामी 11 किंवा 12 एप्रिल ला केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची वाढता संख्या लक्षात लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, सार्वजनिक धार्मिक उपक्रमांवर बंदी यासह आगामी 15 मे पर्यंत शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिगटाने केली आहे. यावर पंतप्रधान मोदी अंतिम निर्णय घेणार आहेत.

हेही वाचा- 'तुझा दाभोलकर होणार', कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांना धमकी

विस्थापित मजूर व गरजू नागरिकांसाठी सरकारने देशभरात 578 जिल्ह्यांमध्ये 22 हजार 567 निवारा छावण्या उभारल्या आहेत. याशिवाय काही स्वयंसेवी संस्थांनीही या प्रकारच्या 3 हजार 909 छावण्यांची सुविधा दिली आहे. यातून एक कोटी गरजू लोकांना निवारा आणि अन्न मिळत आहे. केवळ अन्नवाटप करण्यासाठी 17 हजार केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच काही आस्थापनांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना अन्न व निवारा दिला जात असून, 15 लाख कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली.

संपादन- अक्षय शितोळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2020 11:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading