आता जावई आणि सुनेलाही घ्यायला लागेल सासू-सासऱ्यांची काळजी; नाहीतर होईल 6 महिन्यांची कैद

आता जावई आणि सुनेलाही घ्यायला लागेल सासू-सासऱ्यांची काळजी; नाहीतर होईल 6 महिन्यांची कैद

ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने काही मोठे निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार Maintenance and Welfare Senior Citizens Act 2007 मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 डिसेंबर : ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने (Modi government) काही मोठे निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार कायदाबदल करत घरातल्या बुजुर्गांची काळजी घेण्याची जबाबदारी मुलांबरोबरच जावई आणि सुनांवरही असेल, असा प्रस्ताव आहे. सरकार Maintenance and Welfare Senior Citizens Act 2007 मध्ये असलेल्या ज्येष्ठांची काळजी घेण्याच्या परिभाषेत बदल करणार आहे. ही परिभाषा अधिक विस्तारित करायचा सरकारचा विचार आहे.

ज्येष्ठ नागरिक कल्याण आणि देखभाल कायदा 2007 मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव बुधवारी कॅबिनेट बैठकीत मांडण्यात आला आणि त्याला कॅबिनेटची मंजुरीही मिळाली आहे. आता प्रस्तावित नव्या नियमानुसार, सासू-सासऱ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी सून आणि जावयावरसुद्धा असेल. नव्या नियमांमध्ये आई-वडिलांबरोबर सासू-सासऱ्यांची जबाबदारी घेणंही बंधनकारक असेल. पालकांची देखभाल करण्यासाठी 10 हजार रुपये मेंटेनन्स देण्याची मर्यादा काढून टाकण्यात येऊ शकते. हे विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे.

वाचा - नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, हे डॉक्युमेंट्स दिले नाहीत तर कापला जाणार पगार

या नव्या प्रस्तावित कायद्यानुसार, घरातल्या बुजुर्गांची देखभाल न केल्याची तक्रार आली आणि आरोप सिद्ध झाले तर 6 महिन्यांची कैद होऊ शकते. सध्याच्या तरतुदीनुसार 3 महिन्यांची शिक्षा आहे. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी असं विधेयक आणणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या विधेयकाचा उद्देश ज्येष्ठांचा सन्मान राखणं हा आहे.

वाचा - Bharat Bond ETF : मोदी सरकारने सुरू केली आणखी एक फायदेशीर योजना

या नव्या कायद्यात बुजुर्गांची काळजी घेणाऱ्या आप्तांमध्ये मुलं, मुली, सुना, जावई याबरोबर सावत्र मुलगा-मुलगीसुद्धा सामील आहेत. त्या दृष्टीने कायदेशीर परिभाषेत बदल करण्याचं सुचवण्यात आलं आहे.  याशिवाय या विधेयकात होम केअर सर्व्हिसेस देणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्याचा प्रस्ताव आहे.

-------------------------

अन्य बातम्या

संजय दत्तने संगितली तुरुंगातील शिक्षा कमी करण्याची युक्ती, पाहा VIDEO

'राष्ट्रवादीशी युती कधीच होऊ शकत नाही'; नेत्याचे थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान

उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार, पण दिल्लीत नाही तर...

RBI लवकरच बदलणार ATM संबंधीचे नियम; ग्राहकांवर होणार हा परिणाम

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: December 5, 2019, 9:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading