केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाबाबतचा अध्यादेश मंजूर, घेतले हे मोठे निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाबाबतचा अध्यादेश मंजूर, घेतले हे मोठे निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

  • Share this:

नवी दिल्ली, 07 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत 13-पॉईंट सिस्टिमऐवजी आरक्षणाच्या जुन्या 200 पॉईंट सिस्टिमच्या अध्यादेशाला मंजूरी देण्यात आली आहे. तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या केंद्रीय विद्यापीठात जुन्या पद्धतीने आरक्षण देण्यास मंजूरी दिली आहे. देशात 50 नव्या केंद्रीय महाविद्यालयांना मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने इथेनॉलसाठी सॉफ्ट लोन पॅकेजला मंजूरी दिली असून साखर कारखान्यांना इथेनॉल प्लांट तयार करण्यासाठी सरकारमार्फत कर्जात सूट देण्यास मंजूरी दिली आहे. साखर कारखाने वगळता इतर कंपन्यांना देखील इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांचा मोबदला मिळावा यासाठीही सरकारने पावले उचलली आहेत.

कॅबिनेटमध्ये झालेले निर्णय

>इथेनॉल उत्पादनासाठी 15 हजार कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन मंजूर, इथेनॉल उत्पादकांना जास्तीजास्त 5 टक्के व्याजाने कर्ज मिळेल.

>बक्सर मध्ये थर्मल पॉवर प्लांटला मंजूरी

>13 पॉईंट रोस्टर विरोधातील अध्यादेशाला मंजूरी

>50 नविन केंद्रीय महाविद्यालये सुरू करण्यास मंजूरी

>पश्चिम बंगालचे नारायण आणि ओडिसातील भद्रक अशी 155 किमीच्या तिसऱ्या रेल्वे मार्गाला मंजूरी

>दिल्ली मेट्रोच्या फेज 4 ला मंजूरी.

>उत्तर प्रदेशातील खुर्जा येथे सुपर थर्मल पॉवर प्लांटला मंजूरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 02:02 PM IST

ताज्या बातम्या