News18 Lokmat

India Strikes Back : गेल्या 12 दिवसांमध्ये भारताने पाकला दिले हे 6 मोठे धक्के

पुलवामा हल्ल्यानंतर केवळ 12 दिवसात मोदींनी पाकला मोठे धक्के दिले.

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 08:58 PM IST

India Strikes Back :  गेल्या 12 दिवसांमध्ये भारताने पाकला दिले हे 6 मोठे धक्के

दिल्ली, 26 फेब्रुवारी : पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये CRPF चे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकसह दहशतवाद्यांना याची किंमत चुकवावी लागेल म्हटलं होतं. शिवाय, जवानांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला जाणार असून त्याकरता लष्कराला पूर्ण अधिकार दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. पुलवामा हल्ल्यानंतर देशातून देखील दहशतवाद्यांचा खात्मा करा अशी मागणी केली जात होती. त्यानंतर केवळ 15 दिवसांच्या आत मोदी सरकारनं पाकिस्तानला तब्बल सहा मोठे धक्के दिले.

1. 100 तासात दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामा हल्ल्यामध्ये 100 जवान शहीद झाले. त्यानंतर केवळ 100 तासांच्या आतमध्ये भारतानं पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड असलेल्या गाजी राशिद आणि कामरान खात्ना केला होता.

2. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढला

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. त्यामुळे पाकिस्तानला व्यापारामध्ये दिलेली सूट बंद झाली.

Loading...

3. 200 टक्के आयात कर

मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढल्यानंतर भारतानं पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के कर लावला.

4. पाणी रोखलं

मोदी सरकारनं रावी नदीवरील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाबपूर - कांडी याठिकाणी धरणाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. या प्रोजेक्टला नॅशन प्रोजेक्ट म्हणून देखील घोषित करण्यात आलं आहे. मोदी सरकारनं रोखलेलं पाणी आता जम्मू - काश्मीर आणि पंजाबकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली.

5. UNSCमध्ये उठवला आवाज

पुलवामा हल्ल्यानंतर भारताला अमेरिका, फ्रान्ससह इस्त्रायलनं देखील पाठिंबा दर्शवला. यानंतर भारतानं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसुदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याकरता प्रस्ताव मांडला. त्याला चीननं देखील पाठिंबा दर्शवला.

6. Air Strike

दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय वायू दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले.


VIDEO: शहीद पतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वीरपत्नीनं घेतला 'हा' निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 11:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...