नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : परदेशात काळा पैसा साठवून ठेवणाऱ्या धनदांडग्यांची पहिली यादी सरकारच्या हाती लागली आहे. स्वित्झर्लंडमधल्या बँकांमध्ये गुप्तपणे ठेवलेल्या पैशाची माहिती यात आहे. आता काळ्या पैशावर (black money)लक्ष ठेवण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. भारत आणि स्वित्झर्लंडदरम्यान झालेल्या ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन फ्रेमवर्कमुळे (AEOI)हे शक्य होऊ शकतं.
स्वीस बँकेत असलेल्या भारतीय नागरिकांच्या काळ्या पैशावर नजर ठेवण्यासाठी सरकारला पहिलं यश मिळालं आहे. दोन्ही देशांध्ये झालेल्या करारानुसार विशेष फ्रेमवर्कअंतर्गत स्वीस बँकेतील भारतीय खातेदारांची माहिती भारत सरकारला देण्यात येणार आहे.
काय आहे विशेष फ्रेमवर्क?
स्वीस बँकेत खाती असलेल्या भारतीयांची माहिती मिळणं म्हणजे काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठीची पहिली मोठी पायरी मानली जात आहे. स्वित्झर्लंड सरकारने 75 देशांबरोबर करार केला आहे.
वाचा - RBI चा मोठा निर्णय; ATMमधून नाही निघणार 2000 रुपयांची नोट, कारण...!
स्वित्झर्लंड फेडरल टॅक्स अॅडमिनिस्ट्रेशन (FTA) ग्लोबल फ्रेमवर्क(AEOI)च्या आधारे वित्तीय माहिती या देशांबरोबर शेअर केली जाणार आहे. करचुकवेगिरी करणाऱ्यांविरोधात होणाऱ्या कायदेशीर कारवाईत या माहितीची मदत होणार आहे.
वाचा - प्लास्टिक बंदीचा असाही परिणाम! पाहा ट्रेनमध्ये तुम्हाला कसं मिळणार पाणी
AEOI च्या अंतर्गत भारताला स्वित्झर्लंडकडून मिळालेली ही पहिलीच माहिती आहे. बेकायदेशीरपणे परदेशातल्या अकाउंटमध्ये पैसे साठवून ठेवणाऱ्या भारतीय नागरिकांचा छडा या माहितीच्या आधारे लागू शकतो. त्यांच्याविषयी कायदेशीर कारवाई करण्यासाठी या वित्तीय माहितीचा वापर करता येणार आहे. सरकारच्या हाती लागलेल्या या स्वीस बँकांसंदर्भातल्या पहिल्या यादीत आता कुणाची नावं उघड होतात ते लवकरच कळेल.
वाचा - सोन्याच्या दागिन्यांबद्दल सरकारचा मोठा निर्णय, खरेदी करण्यापूर्वी वाचा नियम
--------------------------------------------
VIDEO :..आणि चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले, मेधा कुलकर्णींबद्दल केला मोठा खुलासा