रेल्वे स्टेशनवर उभी राहणार अशी अत्याधुनिक पॉड हॉटेल, राहायचा खर्च असेल फक्त 1000 रुपये

रेल्वे स्टेशनवर उभी राहणार अशी अत्याधुनिक पॉड हॉटेल, राहायचा खर्च असेल फक्त 1000 रुपये

भारतीय रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचा प्लॅन मोदी सरकारने आखला आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर सर्वप्रथम ही कॅप्शुल हॉटेल्स उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : भारतीय रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचा प्लॅन मोदी सरकारने आखला आहे. रेल्वे स्टेशन परिसरात तात्पुरत्या निवासाची सोय म्हणून पॉड हॉटेल किंवा कॅपशुल हॉटेल उभारली जाणार आहेत. छोट्या जागेत अनेकांची राहण्याची व्यवस्था करण्याची ही योजना आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर ही कॅप्शुल हॉटेल्स तयार करण्याची चाचपणी सुरू झाली आहे. छोट्या जागेत असली, तरी सर्व सुविधांनी युक्त असी हा पॉड्स असणार आहेत.

छोट्याशा जागेत अनेक बेड मावतील अशा हॉटेलची ही संकल्पना मूळची जपानी आहे. ओसाकामध्ये 1979 मध्ये ही कॅप्शुल हॉटेल्स पहिल्यांदा सुरू करण्यात आली. कमीत कमी खर्चात सर्व सुविधांनी युक्त अशी ही हॉटेल्सची संकल्पना आहे. एखाद्या रात्रीसाठी स्टेशन परिसरात राहायची वेळ आली तर सुरक्षित आणि सुज्ज हॉटेलसाठी खर्च करायला नको, अशी ही रेल्वेची सुविधा असणार आहे.

एक बेड मावेल एवढ्या जागेत एसी, छोटा टेबल टॉप, फोन, लॅपटॉप चार्ज करण्याची सुविधा असणार आहे. शिवाय मध्ये पडदे असल्याने तुमची प्रायव्हसीसुद्धा इथे असेल. कॅपशुलसारखी छोटी असल्याने याला कॅप्शुल हॉटेल किंवा पॉड हॉटेल म्हटलं जातं.

मुंबईत प्रायोगित तत्त्वावर पॉड हॉटेल्स सुरू केल्यानंतर देशभरातल्या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन्सवर अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बाप्पाच्या आगमनाआधी 'या' भागांत मुसळधार पाऊस, काही ठिकाणी होणार अतिवृष्टी!

जपानमध्ये सुरू झालेली ही संकल्पना पुढे चीन, बेल्जियम, आइसलँड, हाँगकाँग, इंडोनेशियात पसरली. तिथे अशी छोटेखानी पॉड हॉटेल्स टूरिस्ट डेस्टिनेशनवर हमखास दिसतात.

स्वस्तात फिरून या हे 5 देश!

परवणाऱ्या दरात राहायची उत्तम सोय असं याचं वर्णन करता येईल. रेल्वेच्या फर्स्ट क्लास कंपार्टमेंटसारखी ही व्यवस्था असणार आहे.

---------------

VIDEO : पवार का रागावले? सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 31, 2019, 6:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading