देशात कोरोनाचं वाढतं थैमान, आता मोदी सरकारने आखला नवा प्लॅन

देशात कोरोनाचं वाढतं थैमान, आता मोदी सरकारने आखला नवा प्लॅन

सरकारी पातळीवरून शक्य तितक्या सर्व पर्यायांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या आव्हानाविरुद्ध लढण्यासाठी सरकारी पातळीवरून शक्य तितक्या सर्व पर्यायांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आधी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या लॉकडाऊनच्या कालावधीत आता वाढही करण्यात आली आहे. त्यानंतर आता मोदी सरकारने त्रिस्तरीय यंत्रणा तयार केली आहे.

त्रिस्तरीय यंत्रणेअंतर्गत रुग्णालये काळजी केंद्र, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेडमध्ये विभागण्यात आली आहेत. यासर्व यंत्रणेला रुग्णवाहिकेतून जोडले गेले आहे. रुग्णांना गंभीरतेच्या तीव्रतेनुसार उपचार प्रदान केले जाणारा आहेत. सर्व कोविड-19 मधील रुग्ण गंभीर नसतात.

कोरोनाच्या जवळपास 80 टक्के रुग्णांमध्ये सामान्य लक्षणे आढळतात. त्याच वेळी 15 टक्के लोकांना ऑक्सिजनची आवश्यकता असते, तर 5 टक्के लोकांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. देशभरात अशी 656 रुग्णालये आहेत जी फक्त कोविड रूग्णांसाठी आरक्षित आहेत. यामध्ये एक लाखाहून अधिक बेड आहेत. त्याचबरोबर देशातील दोन लाखाहून अधिक लोकांना अलग ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत.

देशात केवळ 20 हजार व्हेंटिलेटर उपलब्ध होते. त्यामध्ये आता वाढ झाली आहे. रुग्णाच्या आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर उपलब्ध राहणार आहे. सरकारकडेही 3.26 कोटी क्लोरोक्विन गोळ्या आहेत. आयसीएमआर, एम्स यांनीही संयुक्तपणे उपचार प्रोटोकॉल तयार केले आहेत. केंद्र सरकारच्या औषध विभागाला संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बरीच औषधे उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत होत्या. त्या संदर्भात विभागाने उच्चस्तरावर आढावा बैठक घेतली.

हेही वाचा - बिस्कीटच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक, दौंडमध्ये पोलिसांनी जप्त केला 32 लाखांचा माल

डॉक्टरांच्या निर्देशानुसार विकली जाणारी औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकू नयेत, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. क्लोरोक्विन सारख्या औषधांच्या बाबतीत अशा तक्रारी येत होत्या. पीडी, औषध विभागाचे सचिव डॉ. पी.डी. वाघेला यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्योगासमवेत बैठक झाली. यातून अनेक महत्वाच्या विषयांचे निराकरण करण्यात आले आहे.

First published: April 15, 2020, 4:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading