Home /News /national /

मोदी सरकारच्या मंत्र्यांची टेस्ट निगेटिव्ह; संशयावरून होते घरात बंद

मोदी सरकारच्या मंत्र्यांची टेस्ट निगेटिव्ह; संशयावरून होते घरात बंद

केंद्रीय मंत्र्यांना coronavirus ची लागण झाल्याची बातमी पसरली होती. पण मोदी सरकारमधील या मंत्र्यांची टेस्ट निगेटीव्ह आली आहे.

    नवी दिल्ली, 17 मार्च :  कोरोना व्हायरसच्या थैमानात एक दिलासादायक बातमी आली आहे. केंद्रीय मंत्र्यांना coronavirus ची लागण झाल्याची बातमी पसरली होती. पण  मोदी सरकारमधील या मंत्र्यांची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन(V Muraleedharan) हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने सेल्फ क्वारंटाइनमध्ये होते. त्यांनी आपणहूनच स्वतःला घरात बंद करून घेतलं होतं. पण त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं आजच्या चाचणीत निष्पन्न झालं आहे. परराष्ट्र आणि संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन 14 मार्चला तिरुवनंतरपुरम इथे एका मेडिकल इन्स्टिट्यूटच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत सहभागी झालेल्या एका डॉक्टरला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचं उघड झालं. 15 मार्चला या डॉक्टरची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मुरलीधरन यांनीसुद्धा सार्वजनिक ठिकाणचा संचार बंद केला होता. पुढचा प्रसार टाळण्यासाठी त्यांनी  सेल्फ क्वारंटाइन करून घरात बंद करून घेतलं होतं. देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले 126 रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. देशभरात आतापर्यंत या व्हायरसनं तिघांचा बळी घेतला आहे. मुंबईत 17 मार्चला एक दुबईहून आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. तो कोरोनाचा देशातला तिसरा आणि राज्यातला पहिला बळी ठरला. वाचा - दिलीप कुमार यांना Coronavirus ची लागण? आयसोलशनमध्ये ठेवल्याचा ट्विटरवरून खुलासा याआधी 29 फेब्रुवारी रोजी कोरोनाचा पहिला बळी भारतात झाला होता. कर्नाटकातील 76 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर काही दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. ते आपल्या कुटुंबियांसमवेत सौदी अरेबियाला फिरायला गेला होते. त्यांच्या पत्नी आणि मुलगाही कोरना पॉझिटिव्ह आढळून आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, 13 मार्च रोजी 68 वर्षीय महिलेचा दिल्लीत मृत्यू झाला होता. आता मुंबईतील मृत्यूने हा आकडा तीन झाला. मृतांचा आकडा वाढल्यामुळे सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. अन्य बातम्या कोरोनाच्या धोक्यामुळे RBI चं आवाहन, आजपासूनच वापरा डिजिटल पेमेंट पद्धती अन्यथा.. लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय? मुंबई-पुण्यात काय होणार?
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या