देशासाठी जीव घातला धोक्यात, सरकारकडून विंग कमांडर अभिनंदन यांचा वीर चक्र पुरस्कारनं होणार सन्मान?

देशासाठी जीव घातला धोक्यात, सरकारकडून विंग कमांडर अभिनंदन यांचा वीर चक्र पुरस्कारनं होणार सन्मान?

एअरस्ट्राईक कारवाईवेळी अभिनंदन यांनी देशासाठी दाखवलेल्या धाडसाबाबत विंग कमांडर अभिनंदर वर्धमान यांचा गौरव करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा केंद्र सरकारकडून वीर चक्रानं सन्मान होऊ शकतो. एअरस्ट्राईक कारवाईवेळी अभिनंदन यांनी देशासाठी दाखवलेल्या धाडसाबाबत त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. एअरस्ट्राईक कारवाईनंतर भारतीय हद्दीत बिथरलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमान घुसखोरी केली होती. यावेळेस हवाईदलाच्या मिग-21 बायसन विमानानं पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं. पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करतानाच अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर अभिनंदन यांनी पॅराशूटने खाली उडी मारली. पण चुकून ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचले. यानंतर अभिनंदन यांना पाक सैन्यानं आपल्या ताब्यात घेतलं. पाकिस्तानी सैन्यानं प्रचंड मानसिक अत्याचार करत अभिनंदन यांच्याकडून गोपनीय माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण या दबावाला बळी न पडता पाकच्या ताब्यात असतानाही अभिनंदन यांनी प्रचंड धैर्य दाखवलं. त्यांच्या या धाडसाचं देशातच नाही तर देशाबाहेर कौतुक झालं. अखेर आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकून पाकिस्ताननं अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन केलं.

(वाचा :Article 370 : भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावरही धक्का)

देशासाठी दाखवलेल्या याच लढवय्या वृत्तीसाठी अभिनंदन यांना वीर चक्र देऊन त्यांचा सन्मान केला जाण्याची शक्यता आहे. तसंच ज्या वैमानिकांनी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांची तळ उद्ध्वस्त केली, त्या पाच सर्वश्रेष्ठ वैमानिकांचा हवाई दलाच्या सन्मान चिन्हानं सत्कार केला जाणार आहे.

14 फेब्रुवारी 2019 ला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 13 दिवसांनंतर भारतीय हवाई दलानं कुरापती पाकिस्तानविरोधात एअरस्ट्राईक केला आणि बालाकोट परिसरातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली.

(वाचा : ...त्या रात्री अर्धनग्नावस्थेत पोहोचली पीडित तरुणी, पण मदतीऐवजी पोलिसांनी लावलं)

पतीसमोरच पत्नीला लाठ्या-काठ्याने मारहाण, VIDEO व्हायरल

Published by: Akshay Shitole
First published: August 8, 2019, 12:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading