शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'इतकं' अनुदान जमा होणार थेट बँक खात्यात

दिल्लीत बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठकीत मोदी सरकारने काही मोठे निर्णय घेतले. यामध्ये नवी मेडिकल कॉलेज, रिटेल आणि खाण उद्योगातल्या FDI म्हणजेच थेट परकीय गुंतवणूक याशिवाय शेतकऱ्यांसाठी खूशखबर सरकारने दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 08:23 PM IST

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'इतकं' अनुदान जमा होणार थेट बँक खात्यात

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : दिल्लीत बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठकीत मोदी सरकारने काही मोठे निर्णय घेतले. यामध्ये नवी मेडिकल कॉलेज, रिटेल आणि खाण उद्योगातल्या FDI  म्हणजेच थेट परकीय गुंतवणूक याशिवाय शेतकऱ्यांसाठी खूशखबर सरकारने दिली आहे. कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि प्रकाश जावडेकर यांनी दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 60  लाख मेट्रिक टन साखर निर्यात करता येईल. तसंच साखर निर्यातीसाठी 6900 कोटी रुपयांचं अनुदान देण्याचं सरकारने ठरवलं आहे. या सबसिडी किंवा अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादत शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

हेही वाचा - RBI कडे कोट्यवधी रुपये येतात कुठून? जाणून घ्या या 4 गोष्टी

शिवाय उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरात इथे उसाची शेती करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

खाण उद्योगातला मोठा निर्णय म्हणजे कोळसा खाणीसाठी 100 टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. खाण उद्योगाव्यतिरिक्त कोळसा उद्योगाच्या इतर क्षेत्रातही 100 टक्के FDI ला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवा काँट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 100 टक्के FDI ला मंजुरी देण्यात आली आहे.

हे वाचा - 1 सप्टेंबरपासून बदलणार बँकांचे हे 7 नियम, जाणून घ्या सर्व माहिती

डिजिटल मीडियामध्ये 26 टक्के परकीय गुंतवणूक होऊ शकेल. सिंगल ब्रँड रिटेल उद्योगासाठीसुद्धा FDI चे नियम शिथिल करण्यात आले आहेत.

मेडिकल कॉलेज वाढवणार

देशभरात 75 नवी मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे 15700 मेडिकल सीट्स निर्माण होतील. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढल्याने वैद्यकीय व्यावसायिक वाढतील. ज्या शहरांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय नाही, त्या शहरांना या नव्या स्कीममध्ये प्राधान्य मिळणार आहे. मागच्या पाच वर्षांत MBBS आणि PG साठीच्या 45000 जागा वाढवण्यात आल्या आहेत.

गुंडांचा त्रास, अखेर दाम्पत्याने घेतले पेटवून; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 07:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...