राहुल गांधींचा फॉर्म्युला वापरणार नरेंद्र मोदी, हा मोठा निर्णय घेण्याची शक्यता

राहुल गांधींचा फॉर्म्युला वापरणार नरेंद्र मोदी, हा मोठा निर्णय घेण्याची शक्यता

नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता मोदी सरकार हडबडून जागं झालं आहे. गेले कित्येक दिवस ऐरणीवर असलेला कर्जमाफीचा मुद्दा आता निकाली लागण्याची शक्यता आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता मोदी सरकार हडबडून जागं झालं आहे. गेले कित्येक दिवस ऐरणीवर असलेला कर्जमाफीचा मुद्दा आता निकाली लागण्याची शक्यता आहे. कारण  4 लाख कोटी रुपयांचं कर्जमाफी करण्याचा निर्णय मोदी सरकार घेण्याच्या तयारीत आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावर आश्वासन देत राहुल गांधी यांनी आपली ताकद उभी केली. त्यांच्या या फॉर्म्युल्यामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यामुळे आता राहुल गांधींचा हा फॉर्म्युला नरेंद्र मोदीदेखील वापरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

मनमोहनसिंग सरकारनं देशातल्या शेतकऱ्यांना 2009 साली 72 हजार कोटींची देशाच्या इतिहासातली पहिली कर्जमाफी देऊन सत्तावापसीचा मार्ग सोपा केला होता. त्याच लोकप्रिय निर्णयाची पुनरावृत्ती मोदी सरकारही करण्याच्या मनस्थितीत आहे.

नुकत्याच लागलेल्या विधानसभांच्या निकालात शेतकऱ्यांकडून नकारात्मक कौल मिळाल्यावर मोदी सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावर गंभीर झालं आहे. गेल्या 4 वर्षात मोदी सरकारचा केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीला विरोध राहिला आहे. पण 5 राज्यातल्या विधानसभा निकालांनंतर ही परिस्थिती बदलली आहे.

कसं असेल कर्जमाफीचं स्वरूप

- सध्या देशात 26.3 कोटी शेतकरी आहेत

- अंदाजे 4 लाख कोटी रुपयांचं पॅकेज शक्य

- कर्जमाफी झाल्यास 6.6 लाख कोटींचं वित्तीय नुकसान शक्य

- कर्जमाफी झाल्यास जीडीपी 3.5 ऐवजी 3.3 % राहण्याची शक्यता

दरम्यान,  मोदी लाटेवर स्वार होत भाजपनं फक्त केंद्रातच नाही, तर 20पेक्षा अधिक राज्यात सत्तेचं कमळ फुलवलं. मात्र नुकत्याच लागलेल्या 5 राज्यांच्या निकालानंतर, भाजप आता खडबडून जागी झाली आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलीच कंबर कसली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरमच्या निवडणुकांकडे 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिलं गेलं. या सेमीफायनलच्या निकालानं भाजपसाठी 2019च्या फायनलची चिंता वाढवली आहे.

पण आता त्यासाठी भाजपने जोरदार प्लानिंग केलं आहे. त्याचं कारण म्हणजे येत्या काळात पंतप्रधान मोदींच्या हस्ते महाराष्ट्रात विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाकाच लावणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं होणार उद्घाटन

- पुढच्या आठवड्यात मोदींच्या हस्ते होणार मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मेट्रोच्या कामांचं भूमिपूजन

- नागपुरात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन कार्यक्रम करणार. साधारण 1 लाख लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याची तयारी सुरू

- तर कल्याणमध्ये करणार दोन नवीन मेट्रो मार्गाचे भूमिपूजन

- मेट्रो 5 : ठाणे, भिवंडी, कल्याण मेट्रो मार्ग, 24.9 किमीचा मार्ग, एकूण 17 स्टेशन्स, सुमारे 8,500 कोटीचा प्रकल्प

- मेट्रो 9 : दहिसर ते मीरा भाईंदर, सुमारे 12 किमीचा मार्ग, एकूण 11 मेट्रो स्टेशन्स, 6 हजार 600 कोटी रुपयांचा खर्च

2014 चे आयाराम, 2019 चे गयाराम ठरणार? - SPECIAL REPORT

First published: December 13, 2018, 11:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading