मोदी सरकारने लाँच केली बांबूची बाटली, शेणाचा साबण आणि शाम्पूही!

मोदी सरकारने लाँच केली बांबूची बाटली, शेणाचा साबण आणि शाम्पूही!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने नो प्लॅस्टिक मोहीम सुरू केली आहे. सरकार एकदाच वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याचा विचार करतंय. त्यासाठी हा नवा पर्याय आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने नो प्लॅस्टिक मोहीम सुरू केली आहे. सरकार एकदाच वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याचा विचार करतंय. यासाठी नवे पर्यायही आणले जातायत. प्लॅस्टिकच्या बाटल्यांना पर्याय म्हणून बांबूच्या बाटलीची निर्मिती करण्यात येतेय. खादी ग्रामोद्योगनेच ही बांबूची बाटली बनवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ही बांबूची बाटली एका कार्यक्रमात लाँच केली. ही बांबूची बाटली जास्तीत जास्त लोक वापरू लागले तर प्लॅस्टिकला चांगला पर्याय उभा राहील. यासाठी बांबूच्या लागवडीवरही सरकारचा भर आहे.

बांबूच्या बाटलीची ही आहे किंमत

750 मिलीलिटरच्या या बाटलीची किंमत 300 रुपयांपासून सुरू होणार आहे. या इकोफ्रंडली बाटल्या टिकाऊ पण आहेत. बांबूच्या या बाटल्या 2 ऑक्टोबरपासून खादी ग्रामोद्योग स्टोअरमध्ये मिळू शकतील.

2 ऑक्टोबरच्या गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सिंगल यूज प्लॅस्टिकवर सरकार बंदी घालणार आहे. याआधी प्लॅस्टिकच्या ग्लासच्या जागी मातीचे कुल्हडही बनवण्याचा उपक्रमही सुरू झाला आहे.यामुळे रोजगार निर्मितीही होतेय.

(हेही वाचा : भाजपच्या उमेदवार यादीत मुलं, मुली, भाचे, सुना आणि जावई)_

शेणाचा साबण

नितीन गडकरींनी बांबूच्या बाटलीसोबतच खादीची अनेक उत्पादनंही लाँच केली आहेत. त्यांनी ग्रामोद्योग उत्पादनांवर विशेष सूट देण्याची घोषणा केली.

सोलर चरख्यामध्ये कातलेलं वस्त्र, शेणाचा साबण आणि शेणाचा शाम्पू, कच्च्या घाण्याचं मोहरीचं तेल अशा वस्तूंचं लाँचिंग केली आहेत.

=======================================================================================

VIDEO : दुर्मीळ असा पोल्का डॉटेड झेब्रा, अंगावर नाहीत काळे पांढरे पट्टे

Published by: Arti Kulkarni
First published: October 1, 2019, 4:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading