मोदी सरकार तुमच्या खात्यात 15 लाख जमा करत आहे; बँकेच्या बाहेर लागली मोठी रांग!

पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणार आहेत, अशी बातमी वाचून तुम्ही बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर थांबा...

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 05:39 PM IST

मोदी सरकार तुमच्या खात्यात 15 लाख जमा करत आहे; बँकेच्या बाहेर लागली मोठी रांग!

तिरुवनंतपूरम , 01 ऑगस्ट: पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणार आहेत, अशी बातमी वाचून तुम्ही बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर थांबा... मोदी सरकार लोकांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करणार आहे अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. हे वृत्त वाचल्यानंतर अनेक जण बँकेत खाते उघडण्यासाठी पोहोचले. ही संख्या इतकी मोठी होती की बँकेच्या बाहेर रांग लागली. 15 लाख रुपये मिळवण्यासाठी लोक अनके तास उन्हात उभे होते. पण नंतर ही अफवा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना निराश होऊन परत जावे लागले.

केरळमध्ये गुरुवारी सकाळासून सोशल मीडियावर मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणार अशी बातमी फिरत होती. मेसेजमध्ये असे सांगण्यात आले होते की, ज्यांचे पोस्टाच्या बँकेत खाते आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार. हा मेसेज वाचून अनेकांनी खाते उघडण्यासाठी पोस्टात धाव घेतली. पोस्टाच्या बाहेर खाते उघडण्यासाठी इतक्या मोठ्या संख्यने लोक जमा झाले की रांगच लागली. रांगेत उभ्या राहिलेल्या लोकांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी पंतप्रधान मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन पूर्ण केल्याचे सांगितले.

केरळमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मुन्नार येथील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या हजारो कामगारांनी सुट्टी घेत पोस्टाच्या बाहेर खाते उघडण्यासाठी रांग लावली होती. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुन्नार पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या 3 दिवसात 1 हजार 50हून अधिक खाती उघडण्यात आली आहे. मुन्नारच्या आधी देवीकुलम आरडीओ कार्यालयात अशी गर्दी झाली होती. तेव्हा सोशल मीडियावर असे अफवा पसरवण्यात आली होती की सरकार घर नसलेल्या व्यक्तींनी जमीन किंवा घर देणार आहे.

मगर आली रस्त्यावर, सांगलीतला थरकाप उडवणार VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 05:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...