मोदी सरकारचा मोठा निर्णय; भ्रष्ट आणि अयोग्य कर्मचाऱ्यांविरोधात कंबर कसली

मोदी सरकारचा मोठा निर्णय; भ्रष्ट आणि अयोग्य कर्मचाऱ्यांविरोधात कंबर कसली

मोदी सरकारने याबाबत दिशा-निर्देश लागू केले असून यामुळे यामुळे भ्रष्ट कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका मिळणार आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : मोदी सरकारने आता भ्रष्टाचारी आणि अयोग्य सरकाऱ्यांविरोधात कंबर कसली आहे. मोदी सरकारेन अशा कर्मचाऱ्यांची ओळख करण्याचे निर्देश दिले आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता सरकारची कडक नजर असणार आहे.

अशा कर्मचाऱ्यांना लवकरच निवृत्त करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या रेकॉर्डची तपासणी करणार आहे. यासाठी सरकारने दिशा-निर्देशही दिले आहेत. याअंतर्गत अक्षमता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाची तपासणी करण्यात येईल. जे कर्मचारी भ्रष्ट आणि कामचुकार वा अयोग्य असल्याचे दिसून येईल त्यांना सेवानिवृत्त होण्यासाठी सांगण्यात येणार आहे. याबाबत एक रजिस्टर तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

केंद्राच्या दिशा-निर्देशांनुसार केंद्र सरकारने सरकारी सेवांमधील विविध विभागांमध्ये 30 वर्षे पूर्ण केलेल्या 50-55 वर्षांच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा रेकॉर्डची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने सांगितले की, 30 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या 50 ते 55 वयोगटातील कर्मचाऱ्यांवरील अक्षमता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाची तपासणी केली जाईल.

हे वाचा-Reliance Retail-Kishore Biyani deal: भागधारकांसाठी असा फायद्याचा ठरणार हा करार

वेळेपूर्वीच सेवानिवृत्त

केंद्राने सांगितले की सर्विस रेकॉर्डच्या तपासणीनंतर तत्सम कर्मचारी योग्य काम करीत होता की त्याला वेळेपूर्वी सेवानिवृत्त करावयाचे याचा निर्णय घेतला जाईल.

Published by: Meenal Gangurde
First published: August 30, 2020, 9:20 PM IST

ताज्या बातम्या