Home /News /national /

शेतकरी आंदोलनासाठी मोदी सरकारच संपूर्णपणे जबाबदार; भाजपच्या माजी मंत्र्यांची टीका

शेतकरी आंदोलनासाठी मोदी सरकारच संपूर्णपणे जबाबदार; भाजपच्या माजी मंत्र्यांची टीका

सध्या सुरु असलेल्या कृषी आंदोलनाला केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे, अशी टीका NDA सरकारमध्ये एकेकाळी कृषीमंत्री राहिलेले भाजपचे माजी नेते सोमपाल शास्त्री यांनी केली आहे.

    नवी दिल्ली, 9 डिसेंबर : कृषी कायद्यांमधील (Farm Bill) सुधारणांच्या विरोधात राजधानी दिल्लीसह (Delhi) देशभर शेतकरी संघटनांचे (Farmer Union) आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन संपावे यासाठी सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यामधील बोलणी अजूनही यशस्वी झालेली नाही. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच NDA सरकारच्या काळात कृषीमंत्री राहिलेल्या शेतकरी नेत्यांनी मोदी सरकारवर (Modi Government) टीका केली. “सध्या सुरु असलेल्या कृषी आंदोलनाला केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे. हा कायदा तयार करण्यापूर्वी किंवा तयार झाल्यानंतर देखील सरकारनं शेतकऱ्यांच्या शंकांचं समाधान केलं असतं, त्यांच्या मागण्या लेखी स्वरुपात मान्य केल्या असत्या तर इतके मोठे आंदोलन झालंच नसतं,’’ असा दावा माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री सोमपाल शास्त्री यांनी केला आहे. शास्त्री हे उत्तर प्रदेशातील शेतकरी नेते असून अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकार सत्तेत असताना 1998-99 या कालावधीमध्ये ते केंद्रीय कृषीमंत्री होते. तसेच ते राष्ट्रीय किसान आयोग (National Commission on Farmers) चे पहिले अध्यक्ष होते. ‘सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही’ “व्ही.पी. सिंह सरकार सत्तेत असतानाच त्यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी भानू प्रताप समितीची स्थापना केली होती. किमान हमीभाव मुल्य (MSP) निश्चित करणाऱ्या कृषी लागवड आणि मुल्य आयोगाला घटनात्मक दर्जा द्या अशी शिफारस या समितीने केली होती. व्ही.पी. सिंह सरकार सत्तेतून गेल्यामुळे या शिफारशीची तेंव्हा अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर आजही या मागणीसाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु आहे,’’ असं शास्त्री यांनी सांगितलं. (हे वाचा  कोंडी फोडण्यासाठी अमित शहा मैदानात, बोलावली शेतकरी संघटनांची तातडीची बैठक) “केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव देत नाही. त्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केलेली नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी सरकारने अर्धवट लागू केल्या आहेत. सरकारचा आश्वासन पूर्ण करण्याचा इतिहास खराब असून त्यांच्यावर आता अन्नदात्याचा विश्वास राहिलेला नाही,’’ असा दावा देखील त्यांनी केला. शेती करण्यासाठी लागणाऱ्या खर्चात वाढ झाली आहे. खतं, डिझेल, किटकनाशकं, वीज यांच्या किंमती सातत्यानं वाढत आहेत. त्याच्याबरोबर पिकांना योग्य भाव मिळत नाहीय. या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कशी सुधारणार? असा सवाल देखील शास्त्री यांनी विचारला. (हे वाचा - केंद्राकडून शेतकऱ्यांना नवा प्रस्ताव, आंदोलक भूमिकेवर ठाम; कोंडी फोडण्याच्या प्रयत्नांना वेग अर्थमंत्र्यांनी 2019 साली केलेल्या भाषणामध्ये बाजार समित्यांची व्यवस्था ही जुनी आणि निरर्थक असल्याचं मत व्यक्त केलं होतं, याची आठवणंही शास्त्री यांनी करुन दिली आहे
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Farmer

    पुढील बातम्या