मोदी सरकारची आज पहिली कॅबिनेट बैठक, या 5 मुद्द्यांवर होणार चर्चा

मोदी सरकारची आज पहिली कॅबिनेट बैठक, या 5 मुद्द्यांवर होणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची पहिली बैठक होते आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या सरकारचा रोडमॅप सगळ्यांच्या समोर ठेवू शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची पहिली बैठक होते आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या सरकारचा रोडमॅप सगळ्यांच्या समोर ठेवू शकतात.

बजेटच्या मुद्द्यांवर चर्चा

या बैठकीच्या अजेंड्यावर प्रामुख्याने पाच जुलैच्या बजेटचा मुद्दा आहे. या बजेटमध्ये नेमके काय मुद्दे असावेत यावर या बैठकीत चर्चा होईल. पुढच्या पाच वर्षात सरकारला नेमकं काय करायचं आहे याची व्यापक चर्चाही या बैठकीत अपेक्षित आहे.

पंतप्रधान घेणार व्यापक आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत मंत्र्यांना संबोधित करतील. मोदी सरकारच्या पहिल्या इनिंगमध्येही पंतप्रधान नियमितपणे मंत्रिमंडळाची बैठक घेत होते. सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी मंत्र्यांनी प्रयत्न करावेत हाही या बैठकीचा उद्देश होता. महत्त्वाच्या मंत्रालयांच्या कामाचा आढावा या बैठकीत घेतला जात असे.

Loading...

प्रधानमंत्री किसान योजना

निवडणुकीपूर्वी हंगामी अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या प्रधानमंत्री किसान योजनेवरही चर्चा होणं अपेक्षित आहे. या योजनेनुसार दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये दिले जाणार आहेत.

तिहेरी तलाक विधेयक

16 व्या लोकसभेच्या कार्यकाळात तिहेरी तलाक रद्द करण्याच्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी मिळाली होती पण राज्यसभेमध्ये संख्याबळ नसल्यामुळे हे विधेयक मंजूर झालं नव्हतं. सरकारला प्राधान्याने हे विधेयक मंजूर करून घ्यायचं आहे. त्यामुळे संसदेत हे विधेयक दुसऱ्यांदा मांडण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. या बैठकीत या विधेयकावरही चर्चा होऊ शकते.

प्रलंबित विधेयकांवर चर्चा

मागच्या सरकारच्या कार्यकाळात आणखी काही विधेयकंही मंजूर होऊ शकली नव्हती. त्या विधेयकांवरही कॅबिनेट बैठकीत चर्चा होऊ शकते. पुढच्या पाच वर्षांत सरकारला नेमकं काय करायचं आहे याचा आराखडाच या बैठकीत तयार होऊ शकतो.

===================================================================================================

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे उद्या 2 तास बंद राहणार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2019 03:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...