जानेवारीत सुरु होणार आर्थिक वर्ष; पाहा तुमच्यावर काय परिणाम होणार

जानेवारीत सुरु होणार आर्थिक वर्ष; पाहा तुमच्यावर काय परिणाम होणार

आर्थिक वर्षाची सुरुवात जानेवारीपासून झाली तर काय बदल होतील आणि त्याच्या तुमच्यावर काय परिणाम होईल ते जाणून घेऊयात...

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जानेवारी: आर्थिक वर्ष म्हटले की तुमच्या समोर येतो एप्रिल ते मार्च हा कालावधी. पण लवकरच आर्थिक वर्षाची सुरुवात एप्रिल ऐवजी जानेवारी होण्याची शक्यता आहे. यासाठीचे आवश्यक बदल करण्याची तयारी सरकारकडून सुरु आहे. सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार आगामी अर्थसंकल्पात सरकार याची घोषणा करण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर देशात 152 वर्षापासून सुरु असलेली एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षाची परंपरा बदलली जाईल. आर्थिक वर्षाची सुरुवात जानेवारीपासून झाली तर काय बदल होतील आणि त्याच्या तुमच्यावर काय परिणाम होईल ते जाणून घेऊयात...

आर्थिक वर्षाची सुरुवात जर जानेवारीपासून झाली तर केंद्र सरकारला नोव्हेंबरमध्ये अर्थसंकल्प सादर करावा लागले. अर्थात याचा सर्व सामान्य नागरिकांवर फार मोठा परिणाम होणार नाही. फक्त कर नियोजन, कर भरणे, कंपन्यांचे तिमाही कामगिरीचे अहवाल आदी गोष्टींमध्ये बदल होईल. या बदलामुळे परदेशातील शेअर बाजाराप्रमाणे व्यवहार सुरु होतील.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी देखील आर्थिक वर्ष बदलण्या संदर्भात वक्तव्य केले होते. अर्थव्यवस्था वेगवान करण्यासाठी त्याची गरज असल्याचे ते म्हणाले होते. यामुळे अनेक चांगल्या योजना यशस्वी होत नाहीत. भारतात जानेवारी ते डिसेंबर असे आर्थिक वर्ष जाहीर करणारे मध्य प्रदेश पहिले राज्य आहे.

152 वर्षांची परंपरा बदलणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थसंकल्पाची तयारी करण्यास दोन महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे आर्थिक वर्ष बदलले तर अर्थसंकल्प नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाऊ शकतो. भारतात 1 एक एप्रिल ते 31 मार्च असे आर्थिक वर्ष असते. ही व्यवस्था 1867मध्ये स्विकारण्यात आली होती. जेने करून ब्रिटीश सरकारचे आर्थिक वर्ष आणि भारताचे आर्थिक वर्ष एकत्र सुरु होईल. त्याआधी भारतात आर्थिक वर्ष 1 मे ते 30 एप्रिल असे होते.

निती आयोगाने एका अहवालामध्ये आर्थिक वर्षाचा कालावधी बदलण्याची गरज असल्याचे म्हटले होते. सध्याच्या पद्धतीमध्ये केलेल्या कामाचा उपयोग होत नसल्याचे मत आयोगाने व्यक्त केले होते. संसदेच्या अर्थ विषयक स्थायी समितीने देखील आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर अशी करण्याची सूचना केली होती.

काय असते आर्थिक वर्ष

आर्थिक वर्षात 12 महिन्याच्या कालावधीचा हिशोब ठेवला जातो. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल रोजी सुरु होते आणि पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत चालते. या 12 महिन्याच्या कालावधीला आर्थिक वर्ष असे म्हणतात.

PUBG खेळणाऱ्या 'जवानां'नो...तुम्ही होऊ शकता मानसिक रोगी! पाहा Special Report

First published: January 22, 2019, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading