मोदी सरकारचा मोठा निर्णय : या 4 दहशतवाद्यांवर होणार कारवाई

मोदी सरकारचा मोठा निर्णय : या 4 दहशतवाद्यांवर होणार कारवाई

मोदी सरकारने UAPA (Unlawful Activities (Prevention) Amendment Act, 1967) कायद्यानुसार या चौघा क्रूरकर्म्यांना आता कायदेशीररीत्या दहशतवादी घोषित केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : मसूद अजहर, हाफीज सईद, दाऊद इब्राहिम आणि झाकिर उर रहमान लखवी यांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. मोदी सरकारने UAPA (Unlawful Activities (Prevention) Amendment Act, 1967) कायद्यानुसार या चौघा क्रूरकर्म्यांना आता कायदेशीररीत्या दहशतवादी घोषित केलं आहे. त्यासाठी या कायद्यात बदल करण्यात आला. गेल्या महिन्यातच या कायदा बदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात झाल्यानंतरचा हा मोठा निर्णय मानण्यात येत आहे. या चौघांना दहशतवादी म्हणून घोषित करता आलं कारण बेकायदेशीर कृत्य (निवारण) कायदा 1967 यात बदल करण्याचा महत्त्वूपूर्ण निर्णय घेण्यात आला. एखाद्या संघटनेला दहशतवादी संघटना ठरवण्याची सोय या कायद्यात होती. आता देशविरोधी कारवाया करणाऱ्या व्यक्तींनासुद्धा दहशतवादी ठरवता येणार आहे.

मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड

झाकिर उर रहमान लखवी हा मुंबईवर 2008 साली झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड असल्याचं बोललं जातं. त्याच्याकडे भारविरोधी कारवाईचे पुरावे मिळाले आहेत. तो सध्या पाकिस्तानात आहे. दुसरा जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर आणि लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफीज सईद यांना दहशतवादी घोषित करण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला.

हे वाचा - RED Alert! राज्याच्या या 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

हे दोघेही पाकिस्तानात आहेत. मध्यंतरी मसूद अझहरचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याला अद्याप कुठल्याच देशाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे तो कुठे आहे याबद्दल खुलासा झालेला नाही.

मुंबई बाँबस्फोटाचा सूत्रधार

मुंबई बाँबस्फोट प्रकरणातला मास्टर माइंड दाऊद इब्राहिम भारताला गेले कित्येक दिवस हवा असलेला गुन्हेगार आहे. पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मसूद अझहर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला.

पाहा VIDEO: पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी फॉर्म्युला ठरणार, युतीची चर्चा आजपासून सुरू

कारण तो म्होरक्या असलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी उचलली. त्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत दहशवाद्यांच्या तळावर हल्ला केला.

कंदहार विमान अपहरणानंतर जैश-ए-मोहम्मदला बळ

सीआरपीएफच्या ताफ्यातील गाड्या आयईडीने उड़वून देणाऱ्या या संघटनेचा हा पहिलाच हल्ला नाही. 1999 च्या कंदहार विमान अपहरणापासून जैशने आपल्या कारवायांना सुरुवात केली. 1994 ला काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या हरकत-उल-मुजाहिद्दीन चा सदस्य असल्याच्या कारणावरुन अजहर मसूदला अटक केली होती. त्याला सोडवण्यासाठी विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं.

--------------------

SPECIAL REPORT: रिअल हिरो अभिनंदन यांचा नवा जोश, नवा लुक पाहिलात का?

First Published: Sep 4, 2019 04:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading