मोठी बातमी, मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून 2 जणांना संधी, दोघांना डच्चू?

मोठी बातमी, मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून 2 जणांना संधी, दोघांना डच्चू?

गेल्या 20 दिवसांपासून विविध मंत्रालयाच्या मंत्र्यांना बोलून त्यांच्या मंत्रालयाचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 जून :पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ( modi government cabinet reshuffle) चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील (Delhi) राजकीय वर्तुळात चर्चा आहे की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्रातून प्रीतम मुंडे (Preetam Munde) आणि नारायण राणे (Naryan Rane) यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर दोन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

सध्या मोदी सरकारमध्ये अनेक मंत्र्यांकडे मंत्रालयाच्या अतिरिक्त जबाबदारी आहेत. त्यामुळे या जबाबदारी कमी करण्याकरिता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार करण्याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री यांसोबत तीन ते चार वेळा सल्लामसलत केली असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी आणि केंद्रीय सरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत जवळपास पाच ते सहा तास केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर विस्ताराने चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे.

पुण्यात मायलेकराची निर्घृण हत्या; कात्रजमध्ये मुलाचा तर सासवडमध्ये आईचा मृतदेह

गेल्या 20 दिवसांपासून विविध मंत्रालयाच्या मंत्र्यांना बोलून त्यांच्या मंत्रालयाचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत आणि शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत बादल कौर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे दोन्ही मंत्रिपद अजूनही रिक्त आहे. शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या. सोबतच रामविलास पासवान यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याची देखील जागा रिक्त झाली होती.

एकेकाळी जेवणाची भ्रांत असलेला हा अभिनेता आता आहे लक्झरी हॉटेल्सचा मालक

त्यामुळे लवकरच अनेक मंत्र्यांकडे असलेल्या अतिरिक्त मंत्रालयाचा कारभार काढून घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्त्याने हा कारभार वाटप करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे अशी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या खात्यामध्ये सध्या सहा मंत्री आहेत. या पैकी दोन मंत्र्यांना डच्चू देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा ऐकत आहे. सोबतच काही कॅबिनेट मंत्र्यांची अतिरिक्त जबाबदारी मांडण्यात येणार असल्याची चर्चा आहे तर काहींचा खातेबदल करण्याचेही होईल अशी चर्चा आहे.

Published by: sachin Salve
First published: June 16, 2021, 10:10 AM IST
Tags:

ताज्या बातम्या