मोदी सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत तिहेरी तलाकला मंजुरी; काश्मीरबाबत झाला 'हा' निर्णय

मोदी सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत तिहेरी तलाकला मंजुरी; काश्मीरबाबत झाला 'हा' निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नव्या कॅबिनेटची पहिली बैठक राजधानीत झाली. यामध्ये दोन मोठे निर्णय घेण्यात आले.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जून  : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नव्या कॅबिनेटची पहिली बैठक राजधानीत झाली. यामध्ये दोन मोठे निर्णय घेण्यात आले. पहिला निर्णय तिहेरी तलाकच्या संदर्भातला आणि दुसरा निर्णय जम्मू काश्मीरमधल्या राष्ट्रपती राजवटीचा. कॅबिनेटने जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला. तिहेरी तलाकच्या विधेयकालाही कॅबिनेटने मंजुरी दिली. आजच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा रोडमॅप सगळ्यांच्या समोर ठेवणार अशी अपेक्षा होती. या बैठकीचे अन्य मुद्दे अजून स्पष्ट झालेले नाहीत. पण जम्मू काश्मीर खोऱ्यातली निवडणूक आणि तिहेरी तलाक या गोष्टीवर कॅबिनेटने चर्चा केली, असं सूत्रांनी सांगितलं.

तिहेरी तलाकसंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.  जेंडर जस्टीस अर्थात महिलांना न्याय मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असं ते म्हणाले. अनेक मुस्लीम देशांमध्ये तिहेरी तलाकची पद्धत रद्द केलेली आहे. स्त्रियांच्या न्याय्य हक्कांसाठी हे आवश्यक आहे. देश पुढे जात आहे. सबका साथ सबका या मोदी सरकारच्या तत्त्वानुसार मुस्लीम महिलांना न्याय देण्यासाठी हे विधेयक आणण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला आहे.

अध्यादेशाचं कायद्यात परिवर्तन करण्यासाठी विधेयक आणण्यात येणार आहे.याशिवाय कॅबिनेट बैठकीत अर्थसंकल्पाविषयीसुद्धा चर्चा झाल्याचं समजतं. पाच जुलैच्या बजेटचा मुद्दा महत्त्वाचा आहे. अंतरिम अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदी सध्या तरी सरकार कायम ठेवेल, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

'चांद्रयान - 2' मोहिमेची धुरा महिलांकडे, मोहीम 1 हजार कोटींची

या बजेटमध्ये नेमके काय मुद्दे असावेत यावर या बैठकीत चर्चा होईल. पुढच्या पाच वर्षात सरकारला नेमकं काय करायचं आहे याची व्यापक चर्चाही या बैठकीत अपेक्षित आहे.

तिहेरी तलाक विधेयक 

16 व्या लोकसभेच्या कार्यकाळात तिहेरी तलाक रद्द करण्याच्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी मिळाली होती पण राज्यसभेमध्ये संख्याबळ नसल्यामुळे हे विधेयक मंजूर झालं नव्हतं. सरकारला प्राधान्याने हे विधेयक मंजूर करून घ्यायचं आहे.

काश्मीरमध्ये CRPF जवानांवर आत्मघातकी हल्ला, दहशतवाद्यांशी चकमकीचा पहिला VIDEO

त्यामुळे संसदेत हे विधेयक दुसऱ्यांदा मांडण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. या बैठकीत या विधेयकावर चर्चा झाली आणि कॅबिनेटने हा निर्णय मंजूर केला.

शिकाऱ्याचीच झाली शिकार, कुत्र्यांनी लचके तोडून घेतला बिबट्याचा जीव, VIDEO व्हायर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2019 07:35 PM IST

ताज्या बातम्या