News18 Lokmat

मोदी सरकारकडून नववर्षाची भेट, आईप्रमाणे वडिलांनाही मिळणार 730 दिवसांची सुट्टी!

आतापर्यंत अशी रजा महिलांनाच दिली जात होती.

News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2018 05:45 PM IST

मोदी सरकारकडून नववर्षाची भेट, आईप्रमाणे वडिलांनाही मिळणार 730 दिवसांची सुट्टी!

नवी दिल्ली, 28 डिसेंबर : केंद्र सरकार या वर्षाअखेरीस पुरुष कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेणार आहे. ज्या पुरुषांनी पालकत्त्व स्वीकारलेलं आहे, त्यांना आता चाइल्ड केअर लीव्ह (सीसीएल) मिळणार आहेत. पालकत्त्व स्वीकारलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना नोकरीच्या काळात 730 दिवस म्हणजेच दोन वर्षांची रजा घेता येणार आहे. आतापर्यंत अशी रजा महिलांनाच दिली जात होती.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सातवा वेतन आयोग लागून करण्यात आला आहे. त्यामुळे आईप्रमाणे वडिलांनाही चाइल्ड केअर लीव्ह देण्याबाबत केंद्राने शिक्कामोर्तब केलं आहे. परंतु, याचा फायदा हा फक्त ज्या पुरुषांच्या पत्नीचं निधन झालं आहे किंवा घटस्फोट घेतला आहे, अथवा ज्यांच्या मुलाचं वय हे 18 वर्षांखाली असेल, अशांना मिळणार आहे.

एवढंच नाहीतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता, जानेवारी आणि जुलै महिन्यात पहिल्या पाच दिवसांची अतिरिक्त सुट्टी जोडण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे कामगार संघटन मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र जैन आणि अशोक शर्मा यांनी सांगितलं की, "रेल्वे मंत्रालयाही याबद्दल लवकरच आदेश काढणार आहे. रेल्वे कामगारांनी गेल्या वर्षापासूनही मागणी केली होती."

पुरूष केंद्रीय कर्मचाऱ्यांना सीसीएल

आतापर्यंत फक्त महिला कर्मचाऱ्यांना नोकरीदरम्यान 2 वर्ष किंवा 730 दिवस सर्वाधिक सुट्टी ही चाइल्ड केअर लीव (सीसीएल) म्हणून मिळते. सुट्टीच्या काळात पगारही कापला जात नाही. आता अशीच सुट्टी पुरूष कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

Loading...

सीसीएलमधील महत्त्वाचे मुद्दे

- मुलांचं एकल पालकत्त्व स्वीकारलेल्या पुरूषांना सीसीएल मिळू शकतात

- घटस्फोट घेतलेले पुरुष सीसीएलसाठी पात्र ठरतील

- याआधी महिलांनाच अशी रजा मिळत होती

- कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं (DoPT) सरकारी संस्थांना दिला प्रस्ताव

- सुरुवातीला 365 दिवसांत 100 टक्के पगार आणि इतर 365 दिवसांत 80 टक्के पगार दिला गेला पाहिजे

- मात्र, या नियमाला अद्याप स्वीकारलं गेलेलं नाही

====================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 28, 2018 05:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...