या 5 कारणांमुळे घातली मोदी सरकारने घातली चिनी Apps वर बंदी

या 5 कारणांमुळे घातली मोदी सरकारने घातली चिनी Apps वर बंदी

या माहितीचा दुरुपयोग हा देशाच्या सुरक्षेसाठीही धोकादायक असू शकतो असा अहवाल सायबर तज्ज्ञ आणि गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिला होता.

  • Share this:

नवी दिल्ली 29 जून: केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत चिनी कंपन्यांना दणका दिला आहे. कोट्यवधी लोकांच्या फोन्समध्ये असलेल्या तब्बल 59 Appsवर बंदी घालण्यात आल्याने या कंपन्यांना धक्का बसला आहे. भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका पोहोचवू शकतील किंवा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता असलेल्या 59 चिनी मोबाईल अॅपवर (Chinese mobile app) बंदी घालण्याचा निर्णयामागे 5 मोठी कारण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत.

देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कंपन्या या Appsच्या माध्यमातून कोट्यवधी फोन धारकांची माहिती चीनला पाठवित होत्या असं आढळून आलं आहे.

या माहितीचा उपयोग या कंपन्या व्यावसायीक कामांसाठी करत असल्याचं आढळून आलं आहे. त्याचबरोबर फोन वापरणाऱ्याची सुरक्षाही धोक्यात येण्याची शक्यता होती.

मोठी बातमी : TikTok, Helo सह 59 चिनी Mobile Apps वर मोदी सरकारची बंदी

या माहितीच्या आधारेच गेल्या काही दिवसांमध्येच चीनमधून सायबर हल्ल्यांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं होतं.

या माहितीचा दुरुपयोग हा देशाच्या सुरक्षेसाठीही धोकादायक असू शकतो असा अहवाल सायबर तज्ज्ञ आणि गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने केंद्राने हा मोठा निर्णय घेतला.

या कंपन्या भारतातून कोट्यवधींचा नफा कमावत होत्या. सध्याच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर या कंपन्यांची रसद तोडण्याचाही विचार या बंदीमागे असू शकतो अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

देशवासीयांची सायबर स्पेस सुरक्षित राहावी, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या 59 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर मोबाईल अॅप्स आणि इंटरनेट वापरताना कोणती काळजी घ्यावी, डाऊनलोड करताना कुठली माहिती द्यावी याबाबत भारत सरकारने निवेदन जारी केलं आहे.

संपादन - अजय कौटिवार

First published: June 29, 2020, 9:20 PM IST

ताज्या बातम्या