नवी दिल्ली 29 ऑक्टोबर: कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता कांद्याच्या बियाणे निर्यातीवरही केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला. त्यात बियाण्याचंही मोठं नुकसान झालं. त्यामुळे देशात कांदा बियाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने तातडीने हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
कांद्याचे भाव वाढल्याने सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतरही भाव फारसे आटोक्यात आले नाहीत. नंतर परदेशातूनही कांदा आयात केला गेला. आता कांद्यांच्या बियाण्यांचीही टंचाई निर्माण झाली आहे. 1 हजार रुपये किलो असलेलं बियाण्याचे भाव 4 हजारांपर्यंत गेले आहेत.
त्यामुळे कांदा लागवडीसाठी बियाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
पोळ लाल, रांगडा आणि उन्हाळा असा तीन प्रकारचा कांदा असतो. वर्षातून तीन वेळा कांद्याचं पीक घेतलं जातं. मे-जुन, ऑगस्ट-सप्टेबर, जानेवारी-फेब्रुवारी या दरम्यान कांद्याची लागवड केली जाते. निर्यातबंदी केल्याने बियाण्यांच्या भावावर नियंत्रण येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारने एक लाख टन कांदा आयात करण्याचा (Onion Import from Afghanistan) निर्णय घेतला आहे. यामुळे कांद्याच्या वाढत्या किंमतीतून सामान्यांना काहीसा दिलासा मिळेल. हा कांदा अफगाणिस्तानमधून खरेदी केला जाणार आहे. सरकारच्या योजनेनुसार दररोज 4000 टन कांदा भारतात येणार आहे. CNBC आवाजने याबाबत माहिती दिली आहे.
‘पुलवामा हल्ला आम्हीच घडवला’, पाक मंत्र्यांनी इम्रान खानला दिलं श्रेय VIDEO
सरकारकडे केवळ 25 हजार टन कांदा बफर स्टॉकमध्ये शिल्लक असल्यामुळे हा कांदा आयातीचा निर्णय घेण्यात आला आहे. नोव्हेंबरआधीच हा कांदा संपण्याची शक्यता आहे. सध्या देशातील कांद्याचे किरकोळ दर 75 रुपये किलोपेक्षा जास्त आहेत. यामुळे किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कांदा आयात करण्याची तयारी केली आहे.
NAFED विकत आहे स्वस्त कांदे
किंमती नियंत्रित करण्यासाठी नाफेड सुरक्षित भांडारातून कांदा बाजारात आणत आहे. नाफेडने यावर्षी जवळपास एक लाख टन कांद्याची खरेदी केली होती. नाफेडचे डायरेक्टर अशोक ठाकूर यांनी न्यूज18 शी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली आहे, लवकरच 21 रुपये प्रति किलो दराने राज्यांना कांदा पाठवला जाईल.
VIDEO : बिहार निवडणुकीआधी मोठी बातमी, भाषणा दरम्यान तुटला काँग्रेसचा मंच
यानंतर ट्रान्सपोर्ट आणि इतर खर्चांचा हिशोब करुन राज्य त्यांच्या दराने कांदा विकू शकतात. दिल्लीतील सफल स्टोअरवर कांदा 28 रुपये प्रति किलो दराने विकला जातो आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नाफेडकडून हा 21 रुपये प्रति किलोचा कांदा मिळाल्यानंतर राज्य सरकार सर्व खर्च पकडून 30 रुपये प्रति किलोने कांदा विकू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.