मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोदी सरकार जोमात, ड्रग्ज माफिया कोमात, 8 वर्षात 25 पटीने वाढली अमली पदार्थांची जप्ती

मोदी सरकार जोमात, ड्रग्ज माफिया कोमात, 8 वर्षात 25 पटीने वाढली अमली पदार्थांची जप्ती

गेल्या आठ वर्षांत देशातील बंदरे आणि विमानतळांवर हेरॉईन, कोकेन, केटामाइन, मेफेड्रोन यासारखी घातक ड्रग्ज पकडली जात आहेत. या आठ वर्षांत जप्त झालेल्या ड्रग्जच्या प्रमाणाबद्दल बोलायचं झाल्यास, ती 1.52 लाख किलोग्रॅमवरून 3.33 लाख किलोग्रॅमवर पोहोचली आहेत.

गेल्या आठ वर्षांत देशातील बंदरे आणि विमानतळांवर हेरॉईन, कोकेन, केटामाइन, मेफेड्रोन यासारखी घातक ड्रग्ज पकडली जात आहेत. या आठ वर्षांत जप्त झालेल्या ड्रग्जच्या प्रमाणाबद्दल बोलायचं झाल्यास, ती 1.52 लाख किलोग्रॅमवरून 3.33 लाख किलोग्रॅमवर पोहोचली आहेत.

गेल्या आठ वर्षांत देशातील बंदरे आणि विमानतळांवर हेरॉईन, कोकेन, केटामाइन, मेफेड्रोन यासारखी घातक ड्रग्ज पकडली जात आहेत. या आठ वर्षांत जप्त झालेल्या ड्रग्जच्या प्रमाणाबद्दल बोलायचं झाल्यास, ती 1.52 लाख किलोग्रॅमवरून 3.33 लाख किलोग्रॅमवर पोहोचली आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 29 जून  : अंमली पदार्थांची म्हणजेच ड्रग्जची तस्करी (Drug Smuggling) रोखण्यासाठी मोदी सरकार अनेक पातळ्यांवर काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या 'ड्रग्जमुक्त भारत'च्या आवाहनानंतरच गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs) अ‍ॅक्शन मोडमध्ये आलं होतं. गेल्या आठ वर्षांत अवैध ड्रग्ज व्यवसायाशी संबंधित सर्व तपास यंत्रणांवर वचक ठेवण्याचं काम गृहमंत्रालयाने केलं आहे.

केंद्राने कायद्यांमध्ये सुधारणा केली असून, राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय मजबूत केला. सर्व राज्यांमध्ये अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची (Task Force) स्थापना करण्यात आली आहे. आता त्याचा परिणाम दिसून येत आहे. 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं की, अंमली पदार्थांचं सेवन आणि अवैध तस्करी यावर गेल्या आठ वर्षांत जे काम झालंय ते यापूर्वी कधीही झालं नव्हतं. आता भारताला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या तस्करीच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे.

भारतातील इतर देशांच्या सीमांना लागून असलेल्या अनेक राज्यांमधून संघटित ड्रग माफिया हेरॉइन, गांजा, अफिम, क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन, स्यूडो इफेड्रिन, डब्ल्यूवाय टॅब्लेट यांसारखे अंमली पदार्थ भारताच्या इतर भागांत पाठवतात. देशात अंमली पदार्थांचं प्रमाण वाढत असून तरुण वर्ग त्याचा बळी ठरत असल्याचं गृहमंत्रालयानेही मान्य केलं आहे. त्यामुळेच गृहमंत्रालयानेही अंमली पदार्थांविरुद्धच्या या मोहिमेला प्राधान्य दिलं आहे. आता अंमली पदार्थांविरुद्धच्या लढाईत मोदी सरकारसह मणिपूर, गुजरात (Gujrat), पंजाब (Punjab) आणि महाराष्ट्र (Maharashtra) अशा अनेक राज्य सरकारं सहभागी झाली आहेत.

संघटित ड्रग माफियांवर मोदी सरकारची कारवाई

मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या काळात झालेल्या कारवाईची मागील आठ वर्षांतील कारवाईशी तुलना केली, तर पकडल्या गेलेल्या ड्रग्जच्या प्रमाणापासून तस्करांच्या अटकेमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, मोदी सरकारच्या आधीच्या आठ वर्षांत म्हणजे 2006 ते 2013 या कालावधीत अंमली पदार्थांच्या तस्करीच्या केवळ 1257 प्रकरणांची नोंद झाली होती, मात्र 2014 ते 2022 या काळात ती 152 टक्क्यांनी वाढून ही नोंद 3172 झाली आहे. या दरम्यान अटक केलेल्या आरोपींची संख्या 1363 वरून 260 टक्क्यांनी वाढून 4,888 वर पोहोचली आहे.

गेल्या आठ वर्षांत झालेली जप्तीची कारवाई

गेल्या आठ वर्षांत देशातील बंदरे आणि विमानतळांवर हेरॉईन, कोकेन, केटामाइन, मेफेड्रोन यासारखी घातक ड्रग्ज पकडली जात आहेत. या आठ वर्षांत जप्त झालेल्या ड्रग्जच्या प्रमाणाबद्दल बोलायचं झाल्यास, ती 1.52 लाख किलोग्रॅमवरून 3.33 लाख किलोग्रॅमवर पोहोचली आहेत. 2014 पूर्वीच्या आठ वर्षांत 71 किलो मॉर्फिन, 1606 किलो हेरॉईन आणि 216 किलो केटामाइन जप्त करण्यात आलं होतं. त्या तुलनेत 2014 नंतर मॉर्फिन 616 किलो, 3899 किलो हेरॉईन, 784 किलो केटामाइन जप्त करण्यात आलं. त्याचप्रमाणे, अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये 2014 पूर्वीच्या आठ वर्षांत 768 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते, तर 2014 नंतर 20 हजार कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे मोदी सरकारच्या कारवाईत जिथे आधी फक्त छोटे ड्रग्ज सप्लायर (Drug Supplier) पकडले जायचे, तिथे आता मोठ्या सप्लायरवरही कारवाई होत आहे. यासोबतच, डार्कनेटवर एन्क्रिप्टेड मेसेज आणि क्रिप्टोकरन्सीच्या हायटेक सप्लायर्सवरही वचक बसत आहे. याच वर्षी अफगाणिस्तानातून भारतात मोठ्या प्रमाणात हेरॉईनचा पुरवठा करणाऱ्या अनेक मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला. या संदर्भात दिल्लीतील शाहीन बाग येथील एका गोदामातून 1500 कोटी रुपयांचं 150 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे हैदराबादमध्ये (Hyderabad) एका इंटरनेट फार्मसीचा पर्दाफाश करण्यात आला. ही कंपनी अमेरिकेपर्यंत पोस्टाद्वारे अंमली पदार्थांचा पुरवठा करत होती.

गृह मंत्रालय कसं काम करतंय?

गृह मंत्रालयाच्या सूचनेनंतर आता सर्व यंत्रणांचा समावेश करून नार्को कोऑर्डिनेशन सेंटर स्थापन करण्यात आलं आहे. जिल्ह्यात दर महिन्याला आणि राज्यात दर तीन महिन्यांनी यांची बैठक होते. राष्ट्रीय स्तरावर, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो राज्य कोऑर्डिनेशन सेंटरशी समन्वय साधतं. यासोबतच सर्व राज्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक किंवा पोलीस संचालक यांच्या नेतृत्वाखाली नार्कोटिक्स टास्क फोर्स तयार करण्यास सांगितलं आहे. या टास्क फोर्स राज्यातील नार्को कोऑर्डिनेशन सेंटरचं सचिवालय म्हणूनही काम करतं. यामुळे संपूर्ण देशात अंमली पदार्थांविरुद्धच्या लढ्याला उभारी मिळाली आहे. यासोबतच, अंमली पदार्थांच्या तस्करीला पूर्णपणे आळा बसवण्यासाठी पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो नवीन डेटाबेस तयार करत आहे. तो डेटाबेस सर्व एजन्सींशी शेअर केला जाणार आहे.

दरम्यान, आता सर्व राज्यांमध्ये अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. 24X7 नॅशनल नार्कोटिक्स हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय कॅनिन पथक तयार करण्यात आलं आहे. तसंच देशातील सर्व प्रमुख कारागृहांमध्ये व्यसनमुक्ती केंद्रं उघडण्यात आली आहेत. चांगल्या समन्वयासाठी एनसीओआरडी पोर्टल https://pledge.mygov.in/fightagainstdrugabuse/ लाँच करण्यात आलं असून, ‘से येस टू लाईफ, नो टू ड्रग्ज’ (Say Yes to Life, No to Drugs) असं त्याचं घोषवाक्य आहे.

First published:

Tags: Drugs, Modi government