परीक्षा म्हणजे एक उत्सव आहे, मोदी गुरुजींचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

परीक्षा म्हणजे एक उत्सव आहे, मोदी गुरुजींचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

'परीक्षा पे चर्चा' या खास कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तोंडावर आलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसंदर्भात ते आज विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे बोलले. यात लाखोंच्या संख्येनं विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

  • Share this:

16 फेब्रुवारी :'परीक्षा म्हणजे एक उत्सव आहे. फेब्रुवारी, मार्च हा मोसम म्हणजे तणावाचा नाही, तर फेस्टिवलचा आहे.' 'परीक्षा पे चर्चा' या खास कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तोंडावर आलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसंदर्भात ते आज विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे बोलले. यात लाखोंच्या संख्येनं विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

यावेळी बोलताना मोदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, ' आज तुम्हाला एक नवा मित्र मिळाला आहे.'

मी शाळेत असताना इतरांना विनोद सांगायचो. परंतु, त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढत आहे, ही गोष्ट तेव्हा मला समजली होती. आत्मविश्वास ही जीवनात खूप महत्त्वपूर्ण गोष्ट असते. मात्र, आत्मविश्वास म्हणजे बाजारात मिळणारे औषध नव्हे जे एखादी आई परीक्षेच्या दिवशी आपल्या मुलाला देईल. स्वामी विवेकानंद नेहमी एक गोष्ट सांगायचे. ३३ कोटी देवीदेवतांची पुजा करा, त्यांचा आशीर्वाद घ्या, पण जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल तर ३३ कोटी देवही तुमची मदत करु शकणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. आत्मविश्वास नसेल तर तुमची मेहनत वाया जाते, तुम्हाला परीक्षेत उत्तर येत असेल पण आत्मविश्वासाअभावी आठवणार नाही, त्यामुळे जीवनात आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. त्यामुळे आत्मविश्वास कमावण्यासाठी इतरांशी नव्हे तर स्वत:शीच स्पर्धा करा आणि मेहनत करा, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

दुसऱ्याचे अनुकरण करताना तुमच्या पदरी निराशाच येते. तुमची बलस्थाने ओळखा आणि त्याच दिशेने पुढे जात राहा, असा सल्ला त्यांनी दिला.

सुरुवातीलाच त्यांनी मला 10पैकी मार्क द्या म्हणून सांगितलं . कार्यक्रमाच्या शेवटी जमलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना 10पैकी 10 मार्क दिले.

अनेक शाळा, कॉलेजांमध्ये मोदींचा हा कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यात आला.

First published: February 16, 2018, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading