गुजरातमध्ये आज मोदी,राहुल गांधींच्या 3 प्रचार सभा

गुजरातमध्ये आज मोदी,राहुल गांधींच्या 3 प्रचार सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज गुजरातमध्ये ३ सभा आहेत. भावनगर, भरूच आणि दाहोदमध्ये मोदी प्रचारसभा घेणार आहेत.

  • Share this:

06 डिसेंबर:  गुजरातमध्ये आज पुन्हा प्रचाराची रणधुमाळी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज गुजरातमध्ये ३ सभा आहेत. भावनगर, भरूच आणि दाहोदमध्ये मोदी प्रचारसभा घेणार आहेत.

सुरतमध्येही त्यांची सभा होती. पण ओखी चक्रीवादळामुळे ती रद्द करण्यात आली. भाजप अध्यक्ष अमित शहा आज जामनगरमध्ये सभा घेतील, तर भाजप खासदार आणि अभिनेते परेश रावलही प्रचारात उतरणार आहेत. भावी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्याही मोदींप्रमाणेच ३ सभा आहेत. नर्मदा, तापी आणि डांगमध्ये राहुल प्रचार करतील.

नर्मदा , तापी आणि डांग या ठिकाणी आज राहुल गांधींच्या सभा आहेत. नरेंद्र मोदी यांची भावनगर,भरुच ,दाहोद या ठिकाणी सभा होणार आहेत. त्याशिवाय परेश रावल प्रचारात उतरणार आहेत. जामनगरनध्ये अमित शहा यांची सभा होणार आहे.

सध्या गुजरातची निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीचा 18 डिसेंबरला निकाल आहे त्याकडे सगळ्यांचंच  लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 09:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading