News18 Lokmat

नोटाबंदीनंतर 1 लाख कंपन्यांची मान्यता काढली - पंतप्रधान

नवी दिल्लीत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोणताही देश मोठ्यातील मोठ्या संकटातून स्वतःला वाचवू शकतो.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2017 08:22 PM IST

नोटाबंदीनंतर 1 लाख कंपन्यांची मान्यता काढली - पंतप्रधान

01जुलै : देशभरात जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रथमच यासंदर्भात भाषण केलं. नवी दिल्लीत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोणताही देश मोठ्यातील मोठ्या संकटातून स्वतःला वाचवू शकतो. माझ्या आणि तुमच्या (CA) देशभक्तीत कोणतीही कमी नाही. परदेशातील काळा पैशाविरोधात केलेल्या कारवाईचा काय परिणाम होत आहे, याची माहिती स्विस बँकेतील ताज्या आकडेवारी मिळत आहे. स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा 45 टक्क्यांनी कमी झाल्याचे यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

मोदी म्हणाले, जसे डॉक्टर शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतात, तसेच चार्टर्ड अकाऊंटंट्सवर समाजातील आर्थिक स्वास्थ्याची जबाबदारी आहे. डॉक्टरांना माहिती असते की तुम्ही आजारी पडलात त्यांचं उत्पन्न वाढेल तरीही तो तुम्हाला योग्य गोष्टी खाण्यास सांगतो. आपल्या देशाची अर्थव्यवस्था योग्य, निरोगी राहावी हे चार्टर्ड अकाऊंटंट्स पाहतात.

मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

  • नोटाबंदीमुळे जमा झालेल्या रकमेची सखोल चौकशी
  • Loading...

  • नोटाबंदी हा काळा पैसा रोखण्यासाठी उचललेले पाऊल
  • तीन लाखांपेक्षा अधिक कंपन्या तपास यंत्रणांच्या रडारवर
  • २०१४ नंतर स्विस बँकेतील काळा पैसा कमी झाला
  • गरिबांना लुटलंय, त्यांना गरिबांना परत द्यावं लागेल -बोगस कंपन्यांविरोधात कठोर कारवाईसाठी पावले उचलली जात आहेत.
  • अर्थव्यवस्थेत स्वच्छता अभियान सुरू
  • संशयित १ लाख कंपन्यांची नोंदणी रद्द केली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2017 08:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...