घाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणी पंतप्रधानांची मदत

घाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणी पंतप्रधानांची मदत

घाटकोपर सिद्धी साई दुर्घटना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल घेण्यात आलीय. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आलीय.

  • Share this:

31 जुलै : घाटकोपर सिद्धी साई दुर्घटना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल घेण्यात आलीय.  मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आलीय.

याआधी राज्य सरकारकडूनही मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन देत असताना ही घोषणा केली होती. मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींवर सर्व उपचार मोफत केला जाणार असून, त्यांना 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.

इमारत दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरच्या एलबीएस रोडवर दामोदर पार्क येथे असलेली साईदर्शन ही चार मजली इमारत 25 जुलै रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली.  दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केलेल्या अनिल मंडल (२८) या सुपरवायझरलाही २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली आहे. तर या प्रकरणी अन्य पाच जणांकडे चौकशी सुरू असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2017 01:00 PM IST

ताज्या बातम्या