स्वच्छता अभियानात सहभागी झाल्याबद्दल मोदींनी केलं आदित्य ठाकरेंचं अभिनंदन

स्वच्छता अभियानात सहभागी झाल्याबद्दल मोदींनी केलं आदित्य ठाकरेंचं अभिनंदन

'माझ्या तरूण मित्राचं आदित्य ठाकरेचं मी अभिनंदन करतो. ते स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाल्याबद्दल.' असं ट्विट नरेंद्र मोदींनी केलं.

  • Share this:

26 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाल्याबद्दल ट्विटरवरून अभिनंदन  केलंय. 'माझ्या तरूण मित्राचं आदित्य ठाकरेचं मी अभिनंदन करतो. ते स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाल्याबद्दल.' असं ट्विट नरेंद्र  मोदींनी केलं.

नंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत. तसेच देशातील या मोठ्या अभियानात मी आणि उद्धव ठाकरे नेहमीच आपल्यासोबत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

एकीकडे भाजप आणि शिवसेनेत तणाव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मोदींचं हे ट्विट महत्त्वाचं ठरतं.

First Published: Sep 26, 2017 03:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading