पंतप्रधानांनी केलं इस्रोचं अभिनंदन

पंतप्रधान मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून इस्रोचं अभिनंदन केलंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 12, 2018 11:39 AM IST

पंतप्रधानांनी केलं इस्रोचं अभिनंदन

12 जानेवारी : पंतप्रधान मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून इस्रोचं अभिनंदन  केलंय. ट्विट करत ते म्हणाले, 'पीएसएलव्हीच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रो आणि त्यांच्या शास्त्रज्ञांचं मनापासून अभिनंदन. नवीन वर्षातील हे पहिलंच यश देशाच्या तंत्रज्ञानाला आणखी भरारी देईल.'

'हे तंत्रज्ञान सामान्य नागरिक, शेतकरी, मच्छिमार यांना सहाय्यक होईल. इस्रोच्या 100व्या उपग्रहाचं प्रक्षेपण ही आपल्यासाठी उत्तुंग भरारी आहे. यातून भारताच्या भविष्यातील अवकाश तंत्रज्ञानाची वाटचाल घडेल.भारताच्या यशाचे फायदे आमच्या सगळ्या मित्रांना सारखे मिळतील.

31 उपग्रहांपैकी 28 उपग्रह हे 6 वेगवेगळ्या देशांचे आहेत. आर्यभट्ट ते कार्टोसॅट-२ असे १०० उपग्रह इस्रोने अवकाशात सोडलेत. सकाळी ९.२९ मिनटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी ४० राॅकेटमधून ३१ उपग्रह अवकाशात त्यांच्या निर्धारित कक्षेत यशस्वीपणे  सोडण्यात आलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2018 11:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...