Home /News /national /

रामायण पाहण्यासाठी गेले अन् परतलेच नाही; 'मोदी चाय' विकणाऱ्या वृद्धाची निर्घृण हत्या

रामायण पाहण्यासाठी गेले अन् परतलेच नाही; 'मोदी चाय' विकणाऱ्या वृद्धाची निर्घृण हत्या

पंतप्रधान मोदींची प्रेरणा घेऊन चहा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या वयोवृद्धाची हत्या (Tea Seller Murder) केल्याची घटना समोर आली आहे.

    कानपूर, 21 जुलै: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी लहानपणी वडनगर येथील रेल्वे स्थानकावर चहा विकल्याचं आपल्या सर्वांना माहीत आहे. पंतप्रधान मोदींची प्रेरणा घेऊन चहा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या वयोवृद्धाची एका अज्ञात व्यक्तीनं हत्या (Tea Seller Murder) केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीनं 'मोदी चाय' (Modi chai) नावानं छोटसं दुकान सुरू केलं होतं. पण मंगळवारी त्यांची निर्घृण हत्या (Brutal murder) केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. बलराम चसान (Balram Chasan) असं हत्या झालेल्या वयोवृद्धाचं नाव आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरनजीक (kanpur) घाटमपूरच्या हजांबाड रस्त्यावर त्याचं छोटंस चहाचं दुकान होतं. नरेंद्र मोदींचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी आपल्या छोट्याशा चहाच्या दुकाचं नाव 'मोदी चाय' ठेवलं होतं. दुकानाच्या नावामुळे त्यांच्या दुकानाला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. बलराम हे चहाचं दुकानं चालवण्यासोबत भाजपच्या अनेक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत असत. अनेकदा ते कार्यक्रमात गाणेही गात. हेही वाचा-अमानुषतेचा कळस! विजेचा धक्का देऊन केला वडिलांचा खून; रात्री ट्रॉलीत नेऊन... घटनेच्या दिवशी बलराम चसान हे आपल्या चहाच्या दुकानाजवळ असणाऱ्या एका रिसॉर्टमध्ये गेले होते. याठिकाणी रामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री खूप वेळ कार्यक्रम सुरू असल्यानं कार्यक्रमास्थळीच त्यांना खूप उशीर झाला. त्यामुळे ते रात्री उशीरा घरी जाण्याऐवजी आपल्या चहाच्या दुकानाबाहेरच झोपी गेले. हेही वाचा-नांदेडमध्ये गँगवारचा भडका, डोक्यात गोळी झाडून ठार मारले तरीही तलवारीने केले वार पण मंगळवारी सकाळी झोपलेल्या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळला आहे. अज्ञात व्यक्तीनं बलराम यांची दगडानं ठेचून हत्या केल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली आहे. बलराम यांचे दोन्ही डोळेही फोडले होते. चोरीच्या उद्देशातून ही हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयास्पद हालचाली आढळतात का? याचा शोधही पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kanpur, Murder

    पुढील बातम्या