S M L

पंतप्रधान मोदींची दिवाळी एलओसीवर साजरी

यावेळी त्यांनी सीमेवरील जवानांना मिठाई देऊन त्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढवला आहे. जवानांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले,'सगळ्यांप्रमाणेच मीही माझ्या कुटुंबासोबत दिवाळीचा सण साजरा करू इच्छितो. या देशासाठी सीमेवर लढणारे जवान माझे कुटूंब आहेत'.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 19, 2017 03:46 PM IST

पंतप्रधान मोदींची दिवाळी एलओसीवर साजरी

श्रीनगर, 19 ऑक्टोबर: आज सारा देश दिवाळीचा सण साजरा करत आहे. दिवाळीचा उत्साह देशभर दिसून येत असताना पंतप्रधान मोदी मात्र दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी एलओसीवर गेले आहेत.

पंतप्रधान मोदी आज उत्तर काश्मिरच्या गुरेज सेक्टरमध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी गेले आहेत.यावेळी त्यांनी सीमेवरील जवानांना मिठाई देऊन त्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढवला आहे. जवानांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले,'सगळ्यांप्रमाणेच मीही माझ्या कुटुंबासोबत दिवाळीचा सण साजरा करू इच्छितो. या देशासाठी सीमेवर लढणारे जवान माझे कुटूंब आहेत'. तसंच जवानांकडून जगण्याची नवी उर्जा मिळत असल्याचंही आजही पंतप्रधान मोदींनी सांगितलं

पंतप्रधान झाल्यानंतर काश्मिर खोऱ्यात साजरी केलेली ही मोदींची पहिली दिवाळी आहे. याआधी 2014 साली सियाचीनला,15 साली डोगराई वॉर मेमोरियलला तर 2016 साली हिमाचल प्रदेशात सैनिकांसोबत मोदींनी दिवाळी साजरी केली होती. आज ,सकाळी श्रीनगर विमानतळावर त्यांचं स्वागत आर्मी चिफ बिपीन रावत यांनी स्वागत केलं.तिथून ते बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेल सेक्टरमध्ये दिवाळी साजरी करायला गेले.

आज सकाळी साऱ्या देशाच्या नागरिकांना त्यांनी ट्विटरवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2017 03:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close