Home /News /national /

मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात, ठरला 'हा' मुहूर्त ?

मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात, ठरला 'हा' मुहूर्त ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 5 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) याच आठवड्यात (This week) होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर जो थपथविधी झाला होता, त्यानंतरच मंत्रिमंडळाचा एकदाही विस्तार झालेला नाही. तो विस्तार या आठवड्यात होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एनडीएतून (NDA) काही जुने घटक पक्ष बाहेर पडल्यामुळे रिकाम्या झालेला मंत्रीपदाच्या जागा भरण्यासाठी या आठवड्यातील 7 जुलैचा (7 July) सकाळी 11 किंवा संध्याकाळी 6.30 चा मुहूर्त निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. 'टीव्ही 9' या वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार 7 जुलै किंवा 9 जुलै यापैकी एक तारीख शपथविधीसाठी निश्चित केली जाणार आहे. लवकरच या तारखेवर एकमत होऊन ती जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सदानंद सोनोबाल, काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यासह काही नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. या जागा रिक्त 2019 साली सरकार स्थापन करताना भाजपसोबत असणारे काही पक्ष आता साथ सोडून गेले आहेत. शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांनी एनडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांच्या निधनामुळंही एक मंत्रीपद रिक्त झालं आहे. या जागेवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. काही विद्यमान मंत्र्यांना खाती बदलून दिली जातील, अशीदेखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हे वाचा -Fastag चा फंडा, 24 तासात परत आलात तर मिळणार डिस्काऊंट, पण ‘हे’ समजून घ्या जेडियु आणि अपना दलला मोठ्या अपेक्षा जनता दल युनायटेड आणि अपना दल या दोन पक्षांना केंद्रीय सत्तेतील वाटा वाढवून हवा असल्याचं यापूर्वीच स्पष्ट झालं होतं. बिहारमधील मित्रपक्ष असणाऱ्या जेडियुला मंत्रिमंडळात किमान एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर अपना दलच्या अध्यक्षा आणि माजी केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांचीदेखील मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. गेल्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं होतं, मात्र या मंत्रिमंडळात त्यांना स्थान न मिळाल्यामुळं त्या नाराज असल्याची चर्चा होती.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Narendra modi, Union cabinet

    पुढील बातम्या