भाजपच्या बैठकीत मोदी झाले भावूक, म्हणाले त्यांना 'भारत माता की जय' म्हणायला लाज वाटते

भाजपच्या बैठकीत मोदी झाले भावूक, म्हणाले त्यांना 'भारत माता की जय' म्हणायला लाज वाटते

काही पक्ष असेही आहेत जे देशापूर्वी आपल्या फायद्याचा विचार करतात

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मार्च : 'भारत माता की जय'च्या घोषणेचा उल्लेख करत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, या घोषणेत काय अडचण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही बाब भारतीय जनता पक्षांच्या संसदीय दलाच्या बैठकीत सांगितली. येथे मोदी असंही म्हणाले की, 'काही पक्ष असेही आहेत जे देशापूर्वी आपल्या फायद्याचा विचार करतात. काही लोक पक्षासाठी जगतात तर आम्ही आमच्या देशासाठी जगतो. आम्ही सर्वांच्या विकासाचा विचार करतो व सर्वांची सोबत घेऊन चालणारे आहोत', अशी भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

मनमोहन सिंहाचा उल्लेख का केला?

फेब्रुवारी महिन्यात मनमोहन सिंह म्हणाले होते, 'की राष्ट्रवाद आणि भारत माता की जय या घोषणेचा चुकीचा उपयोग केला जात आहे'. जवाहरलाल नेहरुंवर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

हे वाचा - पंतप्रधानांचं नवं ट्वीट, 8 मार्चला महिलांना मिळणार ट्विटर अकाऊंट चालवण्याची संधी

यावर मोदी म्हणाले, 'भारत माता की जय' या घोषणेत काय अडचण आहे? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी पुढे म्हणाले, ‘देशाचा विचार सर्वात आधी येतो. विकास हा भाजपचा मंत्र आहे आणि यासाठी शांती, एकता आणि सद्भावनेची गरज असते. याच्या आधारावर विकास वाढवायचा आहे. ’बैठकीतून बाहेर आल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी सांगितलं, की मोदी यांनी तीव्र शब्दात खासदारांची कानउघडणी केली. ‘देशात शांती, एकता व सद्भावना वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करा. यापूर्वी स्वातंत्र्य लढ्यादरम्यान वंदे मातरमची घोषणा देण्याला देखील काहींनी विरोध केला होता. मात्र फक्त घोषणा न देता ते आत्मसात करा’ असं मोदींनी सांगितलं.

First published: March 3, 2020, 2:42 PM IST

ताज्या बातम्या