मी फक्त चहा विकला, देश नाही- नरेंद्र मोदी

मी फक्त चहा विकला, देश नाही- नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने चहावरून अनेक वेळा निशाणा साधला होता. त्याला आपल्या पहिल्याच सभेत मोदींनी प्रत्युत्तर दिलंय.

  • Share this:

27 नोव्हेंबर: मी चहा विकला, देश विकला नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकोटच्या सभेत काँग्रेसवर प्रतीहल्ला चढवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने चहावरून अनेक वेळा निशाणा साधला होता. त्याला आपल्या पहिल्याच सभेत मोदींनी प्रत्युत्तर दिलंय.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये चार प्रचारसभा आहेत. त्यातील पहिली सभा भुजमध्ये झाली. भुजमधील सभेतही मोदींनी राहुल गांधींचं नाव न घेता जोरदार टीका केली आहे. मी येण्याआधी अनेक लोक इथे येऊन गेले आणि शिंतोडे उडवून गेले.असंही पंतप्रधान मोदी म्हणाले

गुजरातची प्रतिमा डागाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला, या शब्दात मोदींनी राहुल गांधींवर टीका केली. काही दिवसांपासून राहुल गांधी गुजरातमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. आपल्या भाषणांमध्ये त्यांनी मोदींच्या मन की बात सोबतच अनेक धोरणांवर टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी मोदींच्या चहाविक्रीवर टीका करणारं एक पोस्टर काँग्रेसने प्रसिद्ध केलं होतं. त्यावर भाजपने सडकून टीका केली होती.आता त्यानंतर आपण चहा विकला पण देश विकला नाही अशी टीका मोदींनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2017 06:01 PM IST

ताज्या बातम्या