मला नीच म्हणणं 125 कोटी भारतीयांचा अपमान-मोदी

मला नीच म्हणणं 125 कोटी भारतीयांचा अपमान-मोदी

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींना काँग्रेस नेते मणी शंकर अय्यर नीच म्हणाले होते. त्यानंत त्यांच्यावर भाजपने टीकेची झोड उठवली होती. तसंच त्यांना काँग्रेस पक्षातूनही काढून टाकण्यात आलं होतं. त्याला उत्तर आज मोदींनी दिलं आहे. जर मी देशाची मान खाली जाईल असं कोणतंच काम केलं नाही, मग मला नीच का म्हणालात ? माझ्या जन्मामुळे मी नीच ठरतो का ? असा सवाल मोदींनी उपस्थित केला

  • Share this:

10 डिसेंबर: काँग्रेस नेते मणी शंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदींबाबत नीच असा शब्दप्रयोग केला होता. त्यावर आपल्या भाषणात मोदींनी प्रतिक्रिया दिली. मला नीच म्हणणं हा 125 कोटी भारतीयांचा अपमान आहे असं मोदी साणंदच्या प्रचार सभेत म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींना काँग्रेस नेते मणी शंकर अय्यर नीच म्हणाले होते. त्यानंत त्यांच्यावर भाजपने टीकेची झोड उठवली होती. तसंच त्यांना काँग्रेस पक्षातूनही काढून टाकण्यात आलं होतं. त्याला उत्तर आज मोदींनी दिलं आहे. जर मी देशाची मान खाली जाईल असं कोणतंच काम केलं नाही, मग मला नीच का म्हणालात ? माझ्या जन्मामुळे मी नीच ठरतो का ? असा सवाल मोदींनी उपस्थित केला. गरीब कुटुंबात जन्म घेतला म्हणून नीच ठरतो ? मागासलेल्या समाजात जन्म घेतला म्हणून नीच ठरतो ? हा गरिबीचा अपमान आहे अशी टीकाही त्यांनी केली. भारताच्या लोकशाही परंपरेला अनुसरून निवडून आलेल्या सरकारचा अपमान आहे. आणि देशाच्या पंतप्रधानपदाचा अपमान आहे असंही ते म्हणाले.

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यामधील मतदान पूर्ण झाले आहे. 14 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातले मतदान असून 18 डिसेंबरला मतमोजणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2017 07:00 PM IST

ताज्या बातम्या