Home /News /national /

'चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा मोदी-शाहांचा डाव; संजय राऊत वादळाला मुंबईतच अडवणार'

'चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा मोदी-शाहांचा डाव; संजय राऊत वादळाला मुंबईतच अडवणार'

सध्या मुंबईत तौत्के चक्रीवादाळामुळे (Tauktae Cyclone) मुसळधार पाऊस सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या एका खासदारानं शिवसेनेच्या संजय राऊत यांना चिमटा काढला आहे.

    मुंबई, 17 मे: सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. त्यामुळे गोवा किनारपट्टीपासून 150 किमी आतमध्ये  चक्रीवादळला (Cyclone in Arabian Sea) सुरुवात झाली आहे. याचा मोठा फटका भारताच्या पश्चिम किनारपट्टीला बसला असून आता हे वादळ मुंबईला भेदून गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. मागील काही तासांपासून मुंबईत मुसळधार पाऊस (Rain in Mumbai) कोसळत असून अनेक ठिकाणी झाडं, विजेचे खांब कोसळले आहेत. तर काही ठिकाणी रस्तेही तुंबले आहेत. सध्या महाराष्ट्र कोरोना विषाणूच्या साथीसोबतचं तौत्के वादळाचं (Tauktae Cyclone) आपत्कालीन संकटाशीही सामना करत आहे. एकीकडे खराखुरा पाऊस कोसळत असताना, सोशल मीडियावर चक्रीवादळाबाबत हलके फुलके विनोद, चारोळ्या, फोटोज, व्हिडीओज आणि मिम्स मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. अशातचं जळगावचे भाजप खासदार उमेश पाटील (Umesh patil) यांनी वाहत्या पाण्यात हात धुवून घेतला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून तौत्के चक्रीवादळावरुन शिवसेनेचं मुख्या प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय रावतांना (MP Sanjay Raut) जबरदस्त टोला लगावला आहे. त्यांच हे ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, मोदी आणि शाहांचा चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा डाव आहे. पण संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार आहेत. उमेश पाटील यांच्या हा विनोद काल सायंकाळपासूनच सोशल मीडियावर जोरात चर्चेत आहे. विशेष म्हणजे पाटील यांनी आपल्या ट्विटरच्या व्हेरिफाइड अकाऊंटवरुन रावतांना हा टोला लगावला आहे. त्यामुळे हे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. हे ही वाचा-Cyclone Tauktae: रस्त्यांवर पाणी, विमानतळ बंद, सोसाट्याच्या वाऱ्याने मुंबई बेहाल दुसरीकडे तौत्के चक्रीवादळाचा परिणाम आता मुंबई आणि उपनगरांमध्ये (Cyclone Tauktae Mumbai Updates) जाणवू लागला आहे. किनाऱ्याजवळ तर तुफान वेगाने वारे वाहात आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळपासूनच तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हवामान खात्यानं आज मुंबईत Cyclone tauktae मुळे Red Alert जारी केला आहे. आज मध्यरात्रीपर्यंत आणखी पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Amit Shah, Narendra modi, Sanjay raut

    पुढील बातम्या