मोदी-इव्हांका ट्रम्प एकाच मंचावर

मोदी-इव्हांका ट्रम्प एकाच मंचावर

हैद्राबादमध्ये आज ग्लोबल एन्टरप्रेनरशीप समीट सुरू झाली आहे. त्यासाठी अनेक दिग्गज उपस्थित आहेत. या समीटमध्ये इव्हांका ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर उपस्थित होत्या.

  • Share this:

28 नोव्हेंबर: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट झाली. इव्हांका या व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागार आहेत. आणि त्या पदाची जबाबदारी स्वाकीरल्यापासून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

हैद्राबादमध्ये  आज ग्लोबल एन्टरप्रेनरशीप समीट  सुरू झाली आहे.  त्यासाठी अनेक दिग्गज  उपस्थित आहेत. या समीटमध्ये इव्हांका ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर उपस्थित होत्या. ज्या परिषदेसाठी त्या आल्या आहेत, त्याची थीम वुमन फर्स्ट प्रोस्पॅरिटी फॉर ऑल हे आहे.  अर्थात महिलांना प्राधान्य, सर्वांची सुबत्ता. इव्हांका या महिला सक्षमीकरणासाठी बरंच काम करतात. आणि या परिषदेला जे अमेरिकेचं शिष्ठमंडळ आलंय, त्याचं नेतृत्वही त्याच करत आहेत. या कार्यक्रमात सुषमा स्वराजही उपस्थित होत्या.  तसंच मोदींनी भारतातील स्त्री सक्षमीकरणावर प्रकाशही टाकला. भारतातल्या तीन उच्च न्यायालयांमध्येही महिला प्रमुख न्यायाधीश आहेत असंही त्यांनी सांगितलं

इव्हांका ट्रम्प या एक अत्यंत प्रतिभावान युवती असून त्या भविष्यात अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 06:25 PM IST

ताज्या बातम्या