• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • भारत-जपान मैत्रीचा नवा अध्याय, बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमिपूजन

भारत-जपान मैत्रीचा नवा अध्याय, बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमिपूजन

देशातल्या पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा सुरू झालाय. पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान अॅबे यांच्या हस्ते हा सोहळा पडतोय.

  • Share this:
14 सप्टेंबर : देशातल्या पहिल्यावहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचं भूमिपजून अहमदाबादमध्ये झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. महाराष्ट्र आणि गुजरातचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रकल्पातून भारत-जपान मैत्रीच्या नव्या अध्यायाला सुरुवात झालीय. मुंबई ते अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन धावणार आहे. आपल्या भाषणात सर्वच नेत्यांनी दोन्ही राज्यांसाठी किती फायद्याचा आहे, हे ठासून सांगितलं. अॅबेंनी नमस्कार म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात हिंदीतून केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे - भारतात जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांचे मनापासून स्वागत - गती, प्रगती, तंत्रज्ञान आणि विकास हे बुलेट ट्रेनचं वैशिष्ट्य ठरेल - बदलाच्या दिशेने आज भारताने मोठं पाऊल टाकलं आहे - बदल होणं खूपचं गरजेचं आहे - बुलेट ट्रेनमध्ये सुविधा आणि सुरक्षाही आहे,शिवाय यामुळे रोजगारदेखील उपलब्ध होणार आहेत - भारत आणि जपानमधील नात्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि भावनात्मक आहे - आज या प्रकल्पाचं कमी कालावधीत भूमिपूजन होते आहे तर याचे संपूर्ण श्रेय शिंजो आबे यांचे आहे - हायस्पीड कनेक्टिव्हिटीमुळे मोठी आर्थिक प्रगती - बुलेट ट्रेनमुळे मोठ्या प्रमाणात इंधन बचत होण्यास मदत - मुंबई-अहमदाबाद शहरातील अंतर कमी होईल जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या भाषणातील मुद्दे - बुलेट ट्रेनमुळे भारत-जपानचे संबंध अधिक दृढ - जपानमधील बुलेट ट्रेन सेवा अत्यंत सुरक्षित - जपानमध्ये एकही ट्रेन दुर्घटना नाही - जपानमधून 100 इंजिनिअर भारतात दाखल - जपानच्या पंतप्रधानांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक - पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टी असलेले नेते - जपानचा ''ज'' आणि इंडियाचा ''इ'' एकत्र केल्यास 'जय' शब्द निर्माण होतो, असे सांगत आबे यांनी 'जय जपान, जय इंडिया'चा नारा दिला - पुढच्या वेळी मी बुलेट ट्रेनमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भारतात येईन - मला गुजरात खूप आवडतं - शिंजो अॅबे यांनी आपल्या भाषणाचा शेवट 'धन्यवाद' नं केली ही बुलेट ट्रेन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांसाठी विकासाची गंगा आणेल, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. बुलेट ट्रेनचं उद्घाटन मुंबईत व्हावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
First published: